,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
लोकदर्शन गडचांदूर 👉 प्रा.अशोक डोईफोडे
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
पंचायत समिती कोरपणा चे वतीने महावाचन उत्सव 2024 अंतर्गत ग्रंथ प्रदर्शनी व उत्सवाचे आयोजन दिनांक 12 सप्टेंबर 2024 ला स्वर्गवासी भाऊराव पाटील चटप माध्यमिक आश्रम शाळा गडचांदूर येथे करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष व उद्घाटक म्हणून माननीय सचिन कुमार मालवी गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती कोरपना हे होते विशेष अतिथी म्हणून माननीय लोकेश खंडारे शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती कोरपना माननीय कल्याण जोगदंड शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती कोरपणा व प्रमुख अतिथी म्हणून विलास देवाळकर केंद्रप्रमुख सोनुर्ली माननीय पंढरी मुसळे केंद्रप्रमुख गडचांदूर माननीय चंद्रभान वरारकर मुख्याध्यापक स्वर्गवासी भाऊराव पाटील चटप माध्यमिक आश्रम शाळा गडचंदुर माननीय गंगशेट्टिवार मुख्याध्यापक माध्यमिक आश्रम शाळा धानोली हे होते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे विधिवत उद्घाटन करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना माननीय सचिन कुमार मालवी गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती कोरपणा यांनी वाचनाचे महत्त्व विशद करताना पुस्तके ही प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात खूप महत्त्वाची असतात पुस्तके ही ज्ञानाचा समुद्र आहे पुस्तके व्यक्तीच्या जीवनाला योग्य दिशा देण्याचे महत्त्वाचे काम करतात म्हणून पुस्तकांना मानवाचे खरे मित्र देखील म्हटले जाते सृजनात्मक विचारांचा फुलोरा फुलविण्यासाठी वाचन हे महत्त्वाचे आहे पुस्तकातून मिळणारे ज्ञान हे चिरकाल टिकणारे आहे मानवाच्या व्यक्तीमत्वाला फुलविणारे साधन आहे विद्यार्थ्यांनी पुस्तकांचे वाचन विद्यार्थी दशे पासूनच करावे पुस्तके वाचून आपली प्रगल्भता वाढवावी व नवीन कौशल्य आत्मसात करून वाचन चळवळ सक्रियतेने वाढवावी असे प्रेरणादायी विचार यावेळी मांडले विशेष अतिथी म्हणून माननीय लोकेश खंडारे साहेब यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले
ग्रंथ महोत्सवा त पंचायत समिती कोरपणा मधील प्राथमिक शाळेतील उच्च प्राथमिक शाळेतील व माध्यमिक शाळेतील 33 शिक्षकांनी प्रदर्शनी मध्ये आपले स्टॉल लावले या प्रदर्शनी दमाड प्रकाशन जीवतीयांचे स्टॉल आकर्षणाचा केंद्रबिंदू होता दिव्यांग विद्यार्थ्याकरिता समावेशित शिक्षण विभाग गटसाधन केंद्र कोरपना तर्फे विविध पुस्तकांचा स्टॉल लावण्यात आला ग्रंथ प्रदर्शनीला गडचांदूर शहरातील विविध शाळेतील विद्यार्थी व शिक्षक यांनी भेटी दिल्या सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक माननीय कल्याण जोगदंड विस्तार अधिकारी शिक्षण पंचायत समिती कोरपणा यांनी केले प्रास्ताविकेतून महावाचन महोत्सवाचे महत्त्व व ग्रंथ प्रदर्शनी चा उद्देश समजावून सांगितला कार्यक्रमाचे संचालन श्री विकास भंडारवार साधन व्यक्ती गटसाधन केंद्र कोरपणा यांनी केले आभार प्रदर्शन माननीय पंढरी मुसळे केंद्रप्रमुख केंद्र गडचांदूर यांनी केले
ग्रंथ महोत्सवाचे वेळी पंचायत समिती कोरपना मधील विविध शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक विद्यार्थी पालक यांच्या उपस्थितीत ग्रंथ प्रदर्शनी व महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाले ग्रंथ महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी पंचायत समिती कोरपणा मधील सर्व केंद्रप्रमुख सर्वसाधन व्यक्ती व गटसाधन केंद्रातील सर्व कर्मचारी व स्वर्गवासी भावराव पाटील चटप प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांचे मोलाचे सहकार्य लाभले
Home Breaking News महावाचन महोत्सव अंतर्गत गडचांदूर येथे ग्रंथ प्रदर्शनी संपन्न* ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, *” पुस्तके ही...