,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
लोकदर्शन देऊळगाव राजा 👉प्रा.अशोक डोईफोडे
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
लोकमान्य टिळकांनी ज्या उद्देशाने गणेशोत्सव सण सुरू केला तो उद्देशच समोर ठेउन मंडळांनी त्यानुसार समाज प्रबोधनाचे कार्यक्रम घेण्यात यावे,
समाजातील सर्व घटकातील सर्व धर्मातील जातीतील उत्सव आपण एकोप्याने साजरे करावे तसेच प्रत्येकाने आपल्या घरातील तरुण मंडळींना योग्य मार्गदर्शन केल्यास व त्यांच्याकडून उत्साहा दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची काळजी घेतल्यास सर्व धर्मीयांचे सण उत्सव हे शांततापूर्ण उत्साहात साजरे होतील ,उत्साह दरम्यान कायदा हातात घेणाऱ्यांना प्रशासन पाठीशी घालणार नाही असे असे उद्गार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी देऊळगाव राजा येथे नगरपालिका सभागृहमध्ये 11 सप्टेंबर रोजी आयोजित विभागीय शांतता समितीच्या बैठकीत केले.
सविस्तर वृत्त असे की
देऊळगाव राजा येथे विभागातील देऊळगाव राजा, अंढेरा, सिंदखेडराजा, किनगाव राजा, पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सर्व गणेश मंडळ चे अध्यक्षआणि पदाधिकारी तसेच ईद मिलाद उत्सव समितीचे प्रमुख पदाधिकारी आणि शहरातील प्रमुख नागरिकांच्या उपस्थितीत शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन केले होते
बैठकीदरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी उत्सव दरम्यानच्या अनेक मुद्द्यावर मार्गदर्शन केले उत्सवादरम्यान वापरण्यात येणारे डीजे वाजविल्यास , प्रक्षोभक लाइटिंग, लावल्यास शरीरास कशाप्रकारे इजा होऊ शकते याविषयी सखोल मार्गदर्शन केले, उत्साह दरम्यान सर्व जाती धर्मातील सलोखा या ठिकाणी पहावयास मिळतो परंतु गणेश विसर्जन दरम्यान समाजातील काही अतिउत्साही युवक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात पोलीस प्रशासन तर आपली कारवाई करतच असते परंतु घरातील प्रमुख व्यक्तींनी अशा युवकांना योग्य मार्गदर्शन तसेच चांगल्या सूचना केल्या तर अशा घटनांवर कायमचा प्रतिबंध लागू शकतो त्यामुळे घरातील आपल्या प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे की आपला मुलगा बाहेर कुठे काय करतो यावर बारकाईने लक्ष ठेवणे गरजेचे असते वयातील योग्य वेळी योग्य खबरदारी घेतल्यास घरातील युवक वाईट प्रवृत्ती पासून दूर राहू शकतो. मुलांच्या शैक्षणिक तसेच दैनंदिन दिनचर्येवर बारकाईने लक्ष ठेवावे. असेही त्यांनी सांगितले .उत्सवा दरम्यान जातीय सलोखा राहावा यासाठी प्रमुख गणेश मंडळाचे पदाधिकारी प्रयत्न तर करतातच परंतु समिती स्थापन करताना समितीमध्ये निर्व्यसनी, चांगल्या विचाराचे सदस्य घेतल्यास होणारे अनुचित प्रकार टाळता येऊ शकते,कायदा हातात घेणाऱ्यांना किंवा मोडीत काढणाऱ्यांना प्रशासन कोणासही पाठीशी घालणार नाही त्यावर नियमाप्रमाणे कारवाई ती होईलच असे पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी सांगितले
बैठकीदरम्यान अप्पर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी यांनी शांतता समितीच्या बैठकीत आपल्या पाल्याच्या गैर कृत्याला घरातीलच प्रमुख व्यक्ती जबाबदार असतात आपण त्यांना वेळीच बंधन घातल्यास लोकांच्या होणाऱ्या जीवनामध्ये कसलीही बाधा येणार नाही एक वेळेस पोलीस स्टेशनला एफ आय आर झाल्यास सदर युवकाला संपूर्ण जीवनामध्ये सरकारी नोकरी मिळण्यास बाधा येते याचा विचार आपण सर्वांनी केला पाहिजे असे त्यांनी सांगितले. पोलीस उपविभागीय अधिकारी मनीषा कदम यांनी विभागातील पोलीस स्टेशन अंतर्गत गणेश उत्सव मंडळाची सविस्तर माहिती बैठकीदरम्यान सांगितली तसेच नियमावली सांगितली.
आजच्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून अप्पर पोलीस अधीक्षक बी बी महामुनी, उपविभागीय पोलिस अधिकारी मनीषा कदम, देऊळगाव राजा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष महल्ले, नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक अरुण मोकळ,अंढेरा चे ठाणेदार विकास पाटील, सिंदखेड राजाचे ठाणेदार ब्रह्मा शेळके, किनगाव राजाचे ठाणेदार विनोद नरवाडे, अन्य पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्यासह या सर्व पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या श्री गणेश मंडळाचे प्रमुख पदाधिकारी ईद-ए-मिलाद उत्सव समितीचे पदाधिकारी तसेच शहरातील प्रमुख सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, पत्रकार उपस्थित होते.
सभेचे संचालन व आभारप्रदर्शन पोलिस निरीक्षक संतोष महल्ये यांनी केले.