लोकदर्शन 👉 मोहन भारती
राजुरा :– राजीव गांधी पंचायती राज संघटन चंद्रपूर यांच्या संकल्पनेतून गणेश चतुर्थीच्या पावन पर्वावर चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष लोकप्रिय आमदार सुभाषभाऊ धोटे यांचे जनसंपर्क कार्यालय, राजुरा येथे राजीव गांधी पंचायती राज संघटन (आरजीपीआरएस) ग्राम सर्वोदय संवाद अभियानाचा श्रीगणेशा आ. सुभाष धोटे आणि या अभियानाचे प्रचारक, राजीव गांधी पंचायती राज संघटनेने जिल्हाध्यक्ष, इको प्रो संघटनेचे अध्यक्ष बंडू धोतरे यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी आ. सुभाष धोटे, बंडू धोतरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या अभियानाअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्य़ातील जनतेशी संवाद साधून काँग्रेस विचारधारा, विकासकामे, ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी धोरणात्मक उपाययोजना, पर्यावरण रक्षण, मानव कल्याण, आरोग्य, सशक्तिकरण, महिला सबलीकरण, युवक, कामगार, महिला कल्याण, कायदेविषयक जनजागृती, मुलभूत अधिकारांचे रक्षण, निसर्गाचे जतन, पेसा अँक्ट, आदिवासी संस्कृतीचे संवर्धन इत्यादी विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार असून देशाच्या विकासासाठी काँग्रेस, महात्मा गांधींच्या स्वप्नील ग्रामस्वराज्याची पुनर्स्थापना हा विचार गावागावात पोहचविण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
या प्रसंगी राजुरा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे, सभापती विकास देवाळकर, जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे, महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा निर्मला कुडमेथे, शहराध्यक्षा संध्या चांदेकर, माजी अध्यक्षा कविता उपरे, जिल्हा महासचिव एजाज अहमद, सेवा कलश फाऊंडेशनचे अध्यक्ष अभिजीत धोटे, अब्दुल जमीर, युवक काँग्रेसचे इर्शाद शेख, अशोक राव, प्रणय लांडे, सरपंच श्यामराव कोटणाके, जंगु पा. येडमे, शंकर आत्राम, करिष्मा बोबडे, निलकंठ खेडेकर, अमित टेकाम, संजय मेश्राम, सुरज माथनकर, माजी सरपंच कवडू सातपुते, वसंत ताजणे, आनंदराव गावंडे, दिलीप राऊत, नानाजी ढवस, धनराज चिंचोलकर, रेखाताई कोडापे, कृ. उ. बा. स. संचालक, तिरुपती इंदूरवार, विनोद झाडे, माजी संचालक अविनाश जेनेकर, पंढरी चन्ने, संगिता धोटे, उपसरपंच विश्रांती करमनकर, चेतन जयपूरकर, लक्ष्मण एकरे, अनंता एकडे, रमजान शेख, एकनाथ मुठ्ठलकर, चंदु आईलवार, मधुकर झाडे, श्रीधर रावला, दिपक झाडे, शंकर धुर्वे, विनोद वडस्कर यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.