लोकदर्शन 👉अशोककुमार भगत
भटक्या विमुक्त आघाडी भाजपा जिल्हाध्यक्ष तथा मित्रांगण बहुउद्देशीय ग्रामीण विकास युवा मंच,या सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष ‘हितेश चव्हाण’ यांच्या वाढदिवसा निमित्याने 2 सप्टेंबर रोजी गडचांदूरातील लक्ष्मी टॉकीज हॉल येथे भव्य ‘बचतगट महिला मेळावा,रक्षाबंधन तथा शासकीय योजनांची माहिती’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या दिमाखदार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग अध्यक्ष हंसराज (भय्या)अहिर होते तर राजुरा विधानसभेचे माजी आमदार ॲड.संजय धोटे,यांची उद्घाटक म्हणून उपस्थित होती. सामाजिक कार्यकर्ते खुशाल बोंडे,माजी जि.प. अध्यक्ष देवराव भोंगळे,नगरसेवक रामसेवक मोरे,सतीश उपलेंचवार,संजय मुसळे,शितल धोटे,ॲड.मंथनवार मॅडम,सपना सेलोकर, विनोद रणदिवे,किशोर बावणे,गोपाल मालपाणी,महादेव जयस्वाल,शिवाजी सेलोकर, संदीप शेरकी,अरूण महाकाले,कुणाल पारखी, सुयोग कोंगरे,अजीम बेग,इमरान पाशा,मयूर पोटदुखे,महेश घरोटे,शंकर आपुरकर,प्रदीप गुड्डेलीवार इतरांची यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती.हितेश चव्हाण दाम्पत्याने पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार केले. हितेश चव्हाण यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत हंसराज अहिर,माजी आमदार ॲड.संजय धोटे,देवरव भोंगळे,खुशाल बोंडे व इतरांनी हितेश चव्हाणांच्या मित्रांगण बहुउद्देशीय ग्रामीण विकास युवा मंचाच्या माध्यमातून राबविल्या जाणार्या जनहिताच्या कार्यक्रमाचे तोंडभरून कौतुक केले.दरम्यान हंसराज अहिर यांनी हितेश चव्हाण व त्यांच्या पत्नीचे शाल-श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.यानिमित्ताने उपस्थित पाहुण्यांच्या शुभ हस्ते गडचांदूर, जिवती,हरदोना येथील 3 गरजू महिलांना शिलाई मशीन,इतर महिलांना हॅन्ड बॅग,ब्लँकेट, छत्री,विद्यार्थ्यांना स्कुल बॅग,टिफीन बॉक्स तसेच भाजीपाला कॅरेट वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे संचालन ॲड.मंथनवार मॅडम, प्रस्ताविक संस्थेचे अध्यक्ष हितेश चव्हाण तर आभार सपना सेलोकर यांनी व्यक्त केले. हजारों महिला,नेते मंडळी व मित्र परिवाराच्या साक्षीने हितेश चव्हाण यांच्या वाढदिवसाचा दिमाखदार सोहळा साजरा झाला.