विदर्भ महाविद्यालयात शिक्षक -पालक मेळावा संपन्न*

 

लोकर्शन जिवती 👉प्रा.गजानन राऊत

जिवती:- येथील विदर्भ कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात शिक्षक दिनानिमित्त शिक्षक -पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी मंचावर अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शारदा शाक्य या होत्या तर प्रा. गजानन राऊत, प्रा. संजयकुमार देशमुख, प्रा. गंगाधर लांडगे ,प्रा. मस्कले, श्री.आशिष ढसाने, पालक सभेचे संयोजक प्रा. गणेश कदम, मंचावर उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात डॉ. शाक्य यांनी महाविद्यालयातील विविध उपक्रमांची माहिती दिली आणि त्यात विद्यार्थ्यांनी मोठया संख्येने कसा सहभाग घेता येईल, त्याकरिता पालकांची कोणती जबाबदारी आहे याबद्दल सांगितले. प्रा. गजानन राऊत यांनी पालकांनी आपल्या पाल्याला महाविद्यालयात योग्य शिक्षण मिळते की नाही यावर बारकाईने लक्ष ठेवणे आवश्यक असल्याचे सांगितले तसेच पालकांना आपल्या हक्कांची माहिती सांगितली. प्रा. गणेश कदम यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात पालक या नात्याने आपल्या पाल्याकडे विशेष लक्ष केंद्रित करणे आवश्यक असल्याचे सांगितले. या सभेत चर्चेअंती पालक समितीचे गठण करण्यात आले. त्यात अध्यक्ष आशिष ढसाने तर दत्ताराम राठोड, सदाशिव वारे, भाग्यश्री नैताम,अश्विनी राठोड ,दत्ता बेल्लाळे, नामदेव जाधव यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली.
संचालन डॉ. योगेश खेडेकर यांनी तर आभार प्रा. सचिन शिंदे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेकरिता कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *