मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा दोन साठी लखमापूर शाळेचे केले मूल्यांकन ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
लोकदर्शन गडचांदूर👉 प्रा.अशोक डोईफोडे
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मानस उपक्रमातील मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा साठी 2024/025 ची सुरुवात 25 जुलै 2024 पासून झाली आणि 04 सप्टेंबर 2024 रोजी या कार्यक्रमाची समाप्ती होणार आहे,
या दरम्यान जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा लखमापूर येथील सर्व शिक्षकांनी टप्पा दोन साठी
तीन विभागात असलेल्या गुणांकांचं परिपूर्णता करण्यासाठी अथक प्रयत्न केले.
केंद्रस्तरीय शाळेची तपासणी
महाराष्ट्र शासनाच्या माझी शाळा सुंदर शाळा मूल्यांकन दिनांक 30 ऑगस्ट 2024 रोजी शाळेचे मूल्यांकन पंचायत समितीने ठरवून दिलेल्या केंद्रस्तरीय टीम ने केले,
दरम्यान मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान तीन विभागांमध्ये विस्तारित केलेलं होतं
पायाभूत सुविधा 33 गुण ,
शासन ध्येयधोरण अंमलबजावणी 74 गुण ,
शैक्षणिक संपादन 43 गुण
वरील तीनही विभागाची काटेकोरपणे तपासणी करून केंद्रस्तरीय शैक्षणिक संपादन या विषयावर शाळेचे भरभरून कौतुक केलं शाळा ही ह्या अभियानापुरतीच मर्यादित नसून जिल्हा परिषद शाळा मागील 2016 पासून प्रत्येक क्षेत्रामध्ये अव्वल आहे. हे केंद्र तालुका जिल्हापर्यंत आणि काही खेळाडू हे राज्यापर्यंत पोहोचले याची पावती या माझी शाळा स्वच्छ सुंदर शाळा यातून आलेल्या टीम ला समजून आली.
शाळा एक अभिनव उपक्रम एन एस क्यू एफ पोर्टल द्वारे शाळेमध्ये आयसीटी साठी आणि एग्रीकल्चर साठी दोन विषय उत्कृष्टरित्या राबवत असल्याची माहिती टीम ला मिळाली.
सोबतच होलिस्टिक प्रोग्रेस केअर
हा मूल्यांकनाचा विषय शाळेतील सर्व विद्यार्थ्यांसाठी शाळा विद्यार्थ्यांचा 360 अंश मूल्यांकन व्हावं त्या मूल्यांकनाच्या आधारावर तो कोणत्याही शाळेत गेला किंवा त्याच्या पालकाला त्या विद्यार्थ्यांची इथंभूत माहिती मिळावी यासाठी प्रगती पत्रक तयार करून विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करत आहे .ही उल्लेखनीय बाब टीमला मिळाली.
सोबत mooc स्वयम् पोर्टलच्या आधारे शाळेतील 50 टक्के शिक्षकांनी वैयक्तिक ऑनलाईन अभ्यासक्रम पूर्ण करून सर्टिफिकेट मिळवले. आणि त्याचा फायदा शाळेतील मुलांना कसा होत आहे. हेही टीमला अवगत झाले.
शाळेमध्ये एक अभिनव उपक्रम राबवला जातो तो म्हणजे झिरो एनर्जी ग्रीन अर्थ,
पंचायत लखमापूरच्या माध्यमातून शाळेला सोलर पॅनल दोन युनिट दिल्यामुळे हा उपक्रम यशस्वी झाला.
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा लखमापूर 2015 /16 मध्ये आयएसओ मानांकित झाली.
तेव्हापासून आणि त्याही अगोदर पासून मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा पहिल्या टप्प्याचे ही पूर्ण निकष करणारी आणि दुसऱ्या टप्प्याचे ही उत्कृष्ट निकष पूर्ण करणारी आणि नेहमी शासन ध्येय धोरणाची अंमलबजावणी करणारी सर्व कामांची माहिती शासकीय यंत्रणेला तुरंत पोहोचवणारी आणि सणजयंती समारंभ इत्यादी उपक्रम उत्कृष्टपणे राबवणारी शाळा ही आयएसओ जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा लखमापूर हे मागील छायाचित्रावरून टीमला अवगत करून देण्यात आले.
शाळेमध्ये भविष्यवेधी शिक्षणाचे धडे म्हणून दर शनिवारला सामान्य ज्ञानाची परीक्षा घेतल्या जाते. जेणेकरून विद्यार्थी स्पर्धा परीक्षेमध्ये मागे राहू नये.
कला कौशल्यासाठी टाकाऊ पदार्थापासून टिकाऊ पदार्थ बनवण्याची कला विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करून देण्यासाठी शाळा नेहमीच असे उपक्रम घेत असते. शालेय शिक्षणासोबत क्रीडा, शेती, विविध कौशल्य स्पर्धा परीक्षेचा ज्ञान स्किल डेव्हलपमेंट मार्केटिंग असे विविध विषयाचे मार्गदर्शन शाळा आयोजित करत असते.
केअर कचऱ्याचे पुनर्वापर आणि पाऊस पडणाऱ्या पावसाचं व्यवस्थापन शाळा अगदी चौकोनी करत असते ते कचऱ्यासाठी मोठा हौद बांधलेला असून त्याच्यामध्ये केरकचरा झाडापाला पाचोळा ई-कचरा असे वेगवेगळे विभाग करून काही परसबागेसाठी काही ई कचऱ्यापासून मुलं नवीन संशोधन करून त्याच्यापासून नवीन वस्तू बनवण्याचा प्रयत्न करतात ई-कचऱ्याचे व्यवस्थापन अगदी चोखरित्या आणि त्याचा पुरेपूर फायदा टाकाऊ पदार्थाचा टिकाऊ पदार्थ बनवण्याचं मूल्यांकन अंबुजा फाउंडेशन ची अदाणी तीन गुजरात मधील आलेली यांनी प्रात्यक्षिक करून पाहिलं होतं आणि मुलांना त्याबद्दल माहितीही विचारली होती त्यांनी शाळेचे भरभरून कौतुक केलं होतं.
विविध उपक्रमातून शाळा नेहमीच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा भविष्य शिक्षणामध्ये विद्यार्थी मागे राहू नये जिल्हा परिषद मराठी शाळेतील मुलं ही देशाचे नेतृत्व करू शकतात अशा पद्धतीचे विद्यार्थी शाळा घडवण्याचा प्रयत्न करत आहे.
या सर्व गोष्टी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री मोरेश्वर जोगी आणि टीम मागील चार वर्षापासून पहात आहोत शाळेतील शिक्षक आणि शाळेमधील विद्यार्थी आणि पालक यांचा एकोपा यांचा एकत्रित पणा शाळेसाठी समोर येऊन झटणारे पालक व्यवस्थापन समिती शाळेत विविध व्यवस्थापन समिती या शाळेला आग्रही ठेवण्याचा मानस ठेवून कार्य करत आहेत.
सर्व लखमापूर गावातील विविध समित्यांचा ग्रामपंचायत लखमापुर चा नेहमीच शाळा आपली आहे या उद्देशाने.. पाठबळ दिले आहे,समोरील वाटचालीसाठी शाळेला खूप खूप शुभेच्छा दिल्या आहेत,

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *