माझं कवितांचं गाव जकात वाडी

 

लोकदर्शन जावली.👉 राहुल खरात

जावली दि. १ सप्टेंबर
माझं कवितांचं गाव जकात वाडी जावली तालुक्यांची कार्यकारिणी सदस्यत्व व सभासद पदग्रहण समारंभ काल एक सप्टेंबर 2024 रोजी जावली तालुक्यातील चोर आंबे या गावी संपन्न झाला हे गाव आदर्श ग्राम मध्ये जिल्ह्यामध्ये प्रथम आले असून सुंदर अशा निसर्गरम्य वातावरणात पदग्रहण समारंभ व खुले संमेलन पार पडले या संमेलनाचे अध्यक्ष विलास पिसाळ ग्रामीण कथाकार व प्रमुख पाहुणे विलास वरे कथा कादंबरीकार डॉक्टर कुष्ठरोगी हे होते कार्यक्रमाचे उद्घाटन व पदग्रह समारंभ विलास वरे विलास पिसाळ माझं कवितांचं गाव जकातवाडी अध्यक्ष प्रल्हाद पारटे सर उपाध्यक्ष विश्वास नेरकर सर कार्याध्यक्ष सुषमा आले करी सचिव वसुंधरा निकम यांच्या उपस्थितीत पार पडला 13 कवींना पदग्रहण देण्यात आले अतिशय उत्साह पूर्ण वातावरणात कार्यक्रम संपन्न झाला दुपारच्या सत्रात खर्डा भाकरी घेवड्याची आमटी मटकीची उसळ मसाले भात लोणचं सॅलड असा सुंदर जेवणाचा बेत जावली तालुका कार्यकारणीच्या अध्यक्षा सौ जयश्री माजगावकर यांनी केला आणि त्या जेवणाचा आस्वाद घेतल्यानंतर खुले कवी संमेलन पार पडले एकूण 33 कवींच्या कविता सादर झाल्या विविध विषयांना स्पर्श करून भावस्पर्शी कविता सादर करण्यात आल्या कवी संमेलनाचे अध्यक्ष फलटण तालुका कार्यकारणीचे सदस्य अविनाश चव्हाण यांच्या उपस्थितीत पार पडला कवी संमेलनाचे सूत्रसंचालन रानकवी जगदीश वंश यांनी केले अतिशय उत्साह पूर्ण वातावरणात पदग्रहण समारंभ व खुले कवी संमेलन पार पडले. कवी संमेलन चालू असतानाच चोर आंबे गावची ग्रामदेवता पद्मावती आईचे दर्शन घेण्यासाठी कोरेगाव तालुक्याच्या विस्तार अधिकारी मंगल मोरे मॅडम या आल्या असता त्यांचे सत्कार आमच्या कवितांचे गाव जकातवाडी यांच्यातर्फे करण्यात आले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *