.
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
लोकदर्शन देऊळगाव राजा👉 प्रा.अशोक. डोईफोडे
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
संस्काराअभावी पुरुषमन डागाळल्याने पुरुष वर्गाकडून स्त्री वर्गाचे अक्षम्य शोषण होत असल्याने स्त्री जीवन असुरक्षित झाल्याची भावना स्त्री वर्गामध्ये निर्माण झालेली आहे. आपल्या देशात अलीकडे घडून गेलेल्या घटना किळवान्या असून पुन्हा अशा घटना घडू नये यासाठी प्रत्येक स्त्रीची सुरक्षितता इथल्या प्रत्येक नागरिकाचे प्रथम कर्तव्य असल्याचे प्रतिपादन उपविभागीय पोलिस अधिकारी मनीषा कदम यांनी केले.
जनता विद्यालय,आदर्श कला व विज्ञान महाविद्यालय,जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा सिनगाव जहागीर यांच्या सुरक्षा समितीच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी नारीशक्ती सुरक्षा मार्गदर्शन प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 27 ऑगस्ट रोजी देऊळगाव राजा शिक्षण संस्था देऊळगाव राजा च्या संचालक मंडळाच्या प्रेरणेने जनता विद्यालयामध्ये करण्यात आले होते.
सर्वप्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा शाळेचे मुख्याध्यापक प्रा.व्ही.डी. देशपांडे,आदर्श कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.बी.जी.ढाकणे, जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा सिनगाव जहागीर चे मुख्याध्यापक श्री.रामप्रसाद केवट, महिला प्रतिनिधी प्रा.रंजना मांटे,शोभा मंडळकर,भक्ती जायभाये,नेहा तिडके,रोहिणी काकड,हर्षल डोईफोडे, समर्थ डोईफोडे आदींनी मनीषा कदम यांचे स्वागत तथा सत्कार केला.
कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून सिनगाव जहागीर चे तंटामुक्ती समिती अध्यक्ष बबनराव डोईफोडे,जनता विद्यालय सिनगाव जहागीर स्थानिक शाळा समिती सदस्य वामन मामा डोईफोडे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून प्राचार्य ढाकणे यांनी कार्यक्रमाचा उद्देश विशद करत महिलांसंदर्भातील सद्यस्थितीवर यथोचित प्रकाश टाकला.
श्रीमती कदम यांनी विद्यार्थ्यांना गुड टच बॅड टच, स्वतःची सुरक्षा कशी करावी,संकटावर मात कशी करावी हे समजावून सांगत स्वतःला सक्षम करण्यासाठी योग व्यायाम करण्याचे व सकस आहार घेण्याचे आवाहन करत भरपूर अभ्यास करून यशस्वी होण्याचे मार्गदर्शन केले.
तर अध्यक्षीय मनोगतात प्रा.देशपांडे यांनी समाजामध्ये सुख शांती समाधान व बंधुभाव निर्माण होण्यासाठी प्रत्येकाने नीती मूल्याचे पालन करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमास तीनही शाळांचे विद्यार्थी,प्राध्यापक शिक्षक,शिक्षिका व इतर कर्मचारी वृंद आवर्जून उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी जनता विद्यालय सिनगाव जहागीर सुरक्षा समितीने मेहनत घेतली.
कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन सुरक्षा समितीचे सदस्य सचिव वनश्री जनाबापू मेहेत्रे यांनी केले तर उपस्थितांचे आभार मुख्याध्यापक श्री. केवट यांनी मानले.