कोरपना तहसीलदाराला भोवणार कढोली खुर्द ग्रामपंचायतीचे ‘राजकारण’..!

By : Shankar Tadas 
कोरपना : राज्यातील विधानसभा निवडणुका जवळ येत असतानाच गावोगावी राजकारण तापू लागले आहे. त्याला बळ देण्यात राजकीय पक्ष कोणताही कसर सोडत नसल्याचे दिसून येते. कोरपना तालुक्यातील कढोली खुर्द ग्रामपंचायतीचे ‘सत्ताकारण’ सध्या चर्चेत असून येथे अनुसूचित जमातीच्या सरपंच महिला आणि एका सदस्याचे सदस्यत्व रद्द करून तेथे काँग्रेस समर्थित सरपंचाची निवड करण्यात आली आहे. राजकीय दबावाला बळी पडून कोरपना तहसीलदार यांनी 26 ऑगस्ट रोजी घेतलेली सरपंच निवड सभा वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. सदस्य अपात्र केल्यानंतर या आदेशाविरुद्ध अपिल करण्यासाठी 15 दिवस म्हणजेच 27 ऑगस्ट पर्यंत मुदत असताना कोरपना तहसीलदार यांनी 19 ऑगस्ट रोजी घाईघाईत निवड सभेचे आदेश काढले. या प्रकरणाची सुनावणी विभागीय आयुक्त, नागपूर यांच्याकडे 26 ऑगस्ट रोजी असताना त्याच दिवशी ग्रामपंचायत कढोली खुर्द येथे निवड सभा घेऊन नवीन सरपंच निवड करण्यात आली. कायदा धाब्यावर बसवीत कोरपना तहसीलदार आपल्या पदाचा गैरवापर करीत एका विशिष्ट पक्षाच्या बाजूने आदेश देत असून त्यांना तत्काळ निलंबित करण्याची मागणी उपसरपंच विनायक डोहे यांनी पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्याकडे केली आहे. त्यामुळे येथील सरपंच निवडीवर टांगती तलवार असून तहसीलदार यांच्यावर शासन काय कारवाई करते याकडे जनतेचे लक्ष लागून आहे.

  1. #kadholikhurd #कोरपना #korpana
लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *