द्रोणागिरी शहराची दहीहंडी शिवस्वराज्य गोविंदा पथकाने फोडली.

 

लोकदर्शन उरण👉विठ्ठल ममताबादे

उरण दि २७ ऑगस्ट
उरण तालुक्यात गोपाळकाला सण मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. विविध गोविंदा पथक उरण मध्ये कार्यरत आहेत त्यापैकी शिवस्वराज्य गोविंदा पथक कोप्रोली हे नामवंत गोविंदा पथक असून शिवसेना द्रोणागिरी शहराची या वर्षाची दहीहंडी शिवस्वराज्य गोविंदा पथक कोप्रोली यांनी फोडली.यावेळी द्रोणागिरी शिवसेना शाखेतर्फे गोविंदा पथकाचा सन्मान करून त्यांना बक्षीस देण्यात आले यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख मनोहरशेठ भोईर, द्रोणागिरी शाखा प्रमुख जगजीवन भोईर यांच्यासह द्रोणागिरी शिवसेना शाखेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *