लोकदर्शन 👉 मोहन भारती
राजुरा :– रोटरी क्लब राजुराचा पदग्रहण सोहळा नुकताच हॉटेल विहान येथे संपन्न झाला. या प्रसंगी मावळते अध्यक्ष कमल बजाज यांनी नवनियुक्त अध्यक्ष सारंग गिरसावळे यांना रोटरीची कॉलर घालून त्यांच्याकडे पदभार सोपवला तर नवनियुक्त सचिव निखिल चांडक यांनी सुद्धा आपला पदभार स्वीकारला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरी डिस्ट्रिक्ट 3030 चे असिस्टंट गव्हर्नर श्रीकांत रेशीमवाले, चंद्रपूर रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष अजय जैयस्वाल, बल्लारपूर रोटरी क्लबचे सचिव उत्तम पटेल, राजुरा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष संदीप जैन, मावळते अध्यक्ष कमल बजाज, नवनियुक्त अध्यक्ष सारंग गिरसावळे, नवनियुक्त सचिव निखिल चांडक प्रामुख्याने मंचावर विराजमान झाले होते.
अध्यक्षस्थीय मार्गदर्शनात असिस्टंट गव्हर्नर श्रीकांत रेशीमवाले म्हणाले की सदस्यांना क्लबमध्ये सामील होण्यासाठी काय प्रेरणा मिळाली हे समजून घेणे आवश्यक आहे. त्यानुसार त्यांच्या आवडी आणि कौशल्यांशी संबंधित उपक्रमांची आखणी केली जाऊ शकते. सदस्यांना क्लबच्या विविध उपक्रमांमध्ये सक्रियपणे सहभागी करून घेणे, त्यांना महत्त्वाची जबाबदारी देणे आणि त्यांचे योगदान ओळखणे हे महत्त्वाचे आहे.क्लबमधील सदस्यतेचे फायदे, जसे की नेटवर्किंग, कौशल्यविकास, समाजसेवा, इत्यादी याबद्दल स्पष्टपणे सांगणे आवश्यक आहे. तर नवनियुक्त अध्यक्ष सारंग गिरसावळे यांनी येणाऱ्या वर्षांमध्ये कोणकोणते उपक्रम घेतल्या जाईल याची माहिती उपस्थितांना दिली तसेच नवीन कार्यकारणी सुद्धा घोषित केली. चंद्रपूर रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष अजय जैयस्वाल, बल्लारपूर रोटरी क्लबचे सचिव उत्तम पटेल, राजुरा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष संदीप जैन, मावळते अध्यक्ष कमल बजाज यांनी सुद्धा आपले विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाला रोटरी क्लब राजुराचे सदस्य नवल झंवर,अमजद खान, डॉ.गणेश पेटकर, किशोर हिंगाणे, जीवन इंगोले, आनंद मोहरील, अभिषेक गंपावार, समीर चिल्लावार, डॉ. अमोघ कल्लुरवार, सुबोध डाहुले, मयूर बोनगिरवार, निखिल शेरकी, अजहर शेख, राहुल रासेकर, अमोल कोंडावार, केतन जुनघरे, नगमा खान, अर्पणा बजाज, स्नेहल झंवर, वैशाली हिंगाने, भारती कोंडावार, प्रणाली खनके, दमयंती काकडे, कल्याणी मोहरील, शिल्पा डाहुले, पूनम गिरसावळे, स्नेहल शेरकी, स्वाती गंपावार, प्रज्ञा कल्लूरवार, स्वरूपा झंवर, सुषमा शुक्ला, रमेश झंवर, विनोद चन्ने, अंकुश चव्हाण, स्वतंत्र कुमार शुक्ला, उमेश पटेल, हेमराज गेडाम इत्यादी सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन किरण ढुमणे यांनी केले.