लोकदर्शन.उरण👉
विठ्ठल ममताबादे
उरण दि २५ ऑगस्ट दिवसेंदिवस महिलांवर होणारे अत्याचार यामुळे महिलांना आत्म रक्षण, स्व संरक्षणची गरज असून महिलांनी आत्मनिर्भर बनावे, स्वयं सिद्ध व्हावे या अनुषंगाने एआयओसीडी, एमएससीडीए संघटनेचे ऑल इंडिया प्रेसिडेंट अप्पासाहेब शिंदे याच्या नेतृत्वाखाली रायगड जिल्हाध्यक्ष लीलाधर पाटील, रायगड सेक्रेटरी प्रवीण नावानंदार यांच्या मार्गदर्शनाखाली किंडर गार्डन स्कुल, सेक्टर २ उलवे येथे सेल्फ डिफेन्स कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते .वहाळ ग्रामपंचायत सदस्य तथा भाजपा युवा नेते वितेश म्हात्रे, दीपिका म्हात्रे, कींडर गार्डन प्रिंसिपल ऋचा सिंग यांचे विशेष सहकार्य या कार्यक्रमाला लाभले. व्हॉइस प्रेसिडेंट किरण जाधव ,प्रिया पवार ,शर्वरी पवार,आशा चव्हाण, चांदणी शेख, गोविंद जाधव, रणजित मिश्रा,वर्षा चासकर,शकुंतला लोधी,श्रीनिधी पाटील यांनी सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली.राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त मार्शल आर्ट्स अनिकेत जाधव, प्रतीक भेंग्रा आणि त्यांच्या टीमच्या मार्गदर्शन खाली सदर प्रोग्राम घेण्यात आले.निकिता गाडघे यांनी सर्वा करता नाश्ताची व्यवस्था केली.कार्यक्रमाचे उत्तम आयोजन व नियोजन केल्याने उपस्थित
महिलांनी आयोजकांचे व उपस्थित मान्यवरांचे आभार मानले .महिलांना कार्यक्रम खूप आवडला तसेच महिलांना विविध प्रशिक्षण देण्यात आले त्यामुळे महिलांमध्ये आत्मविश्वास वाढला असून त्याचा त्यांना भविष्यात निश्चितच फायदा होईल.असे मत सीमा पाटील यांनी व्यक्त केले.अन्यायाला नेहमी विरोध करा. अन्याय सहन करू नका असा संदेश यावेळी आपल्या मनोगतातून केमिस्ट असोसिएशन उलवे च्या प्रेसिडेंट सीमा पाटील यांनी महिला वर्गांना दिला आहे.