By : Shankar Tadas
गडचांदूर : बहिण-भावाच्या पवित्र नात्याचे प्रतीक मानला जाणारा रक्षाबंधन सण बिबी येथील एकलव्य इंग्लिश स्कूल अँड ज्यूनिअर कॉलेजचा विद्यार्थीनींनी गडचांदूर येथील पोलीस स्टेशन मध्ये जातं पोलिसदादांना राखी बांधत साजरा केला. एकलव्य स्कूलच्या विद्यार्थिनींनी पोलीस निरीक्षक, ठाणेदारांसह सर्व पोलिसदादाना राख्या बांधल्या. यावेळी पोलीस निरीक्षक शिवाजी कदम यांनी महिलांच्या संरक्षणाची जबाबदारी पोलिसांवर असल्याचे सांगितले. विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना सहायक फौजदार शंकर मोहुर्ले यांनी पोलीस खात्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली. पोलीस निरीक्षक शिवाजी कदम, शाळेचे उपमुख्याध्यापक अखिल अतकारे, शिक्षिका प्रिया चौधरी, संध्या पिंगे, सहाय्यक फौजदार शंकर मोहूर्ले, पोलीस हवालदार इंदल राठोड, पोलीस अमलदार तिरुपती माने, महेश चव्हाण, प्रभू मामीलवाड, महिला पोलीस शिपाई, कविता पळणाटे, सुलोचना नागरगोजे आदी मान्यवर उपस्थिती होते. रक्षाबंधनिमित्त स्कूलमध्ये राखी तयार करण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत सक्रिय सहभाग घेऊन वर्ग ९ वी च्या रितिका पवार, आचल चव्हाण, श्रेया बावणे, संतोषी पेचे, सानिया पोहनकर, अक्षरा कदम तर वर्ग ८ वी च्या योगिनी दोनोंडे, श्रावणी कुळसंगे,चैताली कांबळे, रिया वानखेडे, वेदांती कोल्हे या विद्यार्थिनींनी स्वतः तयार केलेल्या राख्या पोलिसांना बांधत बंधुभाव जोपासला.