काँग्रेस नेत्या माजी नगराध्यक्ष सुनीता लोढिया यांना जीवे मारण्याची धमकी *♦️प्राचार्य डॉ.अनिल मुसळेवर अदखलपात्र गुन्ह्याची नोंद

 

लोकदर्शन 👉 प्रा.अशोक डोईफोडे
.

कोरपना – नांदा येथे स्वातंत्र्यदिनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बहुउद्देशीय मंडळ, नांदा येथील अध्यक्ष सुनीता लोढीया यांना त्यांच्याच संस्थेतील सचिव तथा प्राचार्य अनिल मुसळे यांनी अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करीत गडचांदूर पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आली. प्रकरण गंभीर असल्याने पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंद केला आहे.
संस्थेत गैरप्रकार उघडकीस आल्यामुळे अनेक दिवसांपासून अध्यक्ष व सचिवांमध्ये वाद सुरू आहे. स्वातंत्र्यदिनी हा वाद आणखी चव्हाट्यावर आला असून पाऊस लागल्याने व्यवस्थापन कार्यालयात बसण्याकरिता अध्यक्ष सुनीता लोडिया यांनी सचिव अनिल मुसळे यांना कार्यालयाची चावी मागितली असता ती चावी देण्यास मुसळे यांनी नकार दिला व शिवीगाळ करून निघून गेल्याचा आरोप सुनिता लोढीया यांनी केला आहे. पुढील तपास गडचंदूर पोलीस करीत आहे.

वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बहुउद्देशीय मंडळ, नांदा या संस्थेचे नांदा येथे श्री. प्रभू रामचंद्र विद्यालय, गुरुकुल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, बीएड कॉलेज, इंग्लिश मीडियम शाळा आहेत. काही दिवसापूर्वी शाळेचे मुख्याध्यापक अनिल मुसळे व सहाय्यक शिक्षिका योगिता कुळमेथे या दोघांवरही बोगस शिक्षक भरती प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला होता. संस्थेमध्ये शिक्षक भरतीत मोठा घोळ व आर्थिक अफरातफर होत असल्याचे लक्षात आल्याने मी स्वतः शाळेच्या कारभाराकडे लक्ष देणे सुरू केले आहे. ही बाब मुसळे यांना पचनी पडत नसल्याने स्वातंत्र्यदिनी मला कारने कट मारून इजा पोहोचवण्याचा प्रयत्न केला.
– सुनीता लोढिया, अध्यक्ष राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बहुउद्देशीय मंडळ, नांदा

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *