लोकदर्शन जिवती 👉प्रा. गजानन राऊत
ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त विदर्भ कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स, जिवती येथे एक दिवसीय सेमिनारचे आयोजन करण्यात आले.
देशभरात 12 ऑगस्ट हा दिवस ग्रंथपाल दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवशी ग्रंथालयाकडून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते.
*ग्रंथालय आणि माहितीशास्त्र या व्यावसायिक क्षेत्राच्या विकासासाठी डॉ. एस. आर. रंगनाथन यांचे योगदान* या विषयावर एक दिवसीय सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते.
या सेमिनार साठी डॉ. राजेश कुमार लोहिया, ज्ञान स्त्रोत केंद्र प्रमुख, नॅशनल इनवोरमेंटल रिसर्च इन्स्टिट्यूट, नागपूर हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. डॉ. एस. एच. शाक्य मॅडम, प्रा. जि. एस. राऊत, प्रा. एस. बि. देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. आर. के. लोहिया यांनी आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांचा वाचनाकडे कल कमी होत असल्यामुळे ग्रंथपालांनी सतत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची सवय वृद्धिंगत होईल यासाठी प्रयत्न करावेत असे मत व्यक्त केले. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. एस. एच. शाक्य यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांनी सतत ज्ञान अर्जन करून आपल्या जीवनातील ध्येय प्राप्त करण्यासाठी सतत प्रयत्नशील असावे असे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. वैशाली डोरलीकर यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक श्री. एम. एस. साबळे यांनी केले आणि डॉ. दिनेश दुर्योधन यांनी आभार व्यक्त केले.
मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात सहभागी झाले होते. या एक दिवशीय सेमिनारच्या यशस्वी ते करिता सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्य केले.