भक्तीमहामार्गला शेतकऱ्यांचे समर्थन ♦️शेतकऱ्यांचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन

लोकदर्शन देऊळगाव राजा👉 प्रा.अशोक डोईफोडे
हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्गावर असलेल्या ऐतिहासीक नगरी मां जिजाऊ साहेबांचे जन्मस्थळ सिंदखेड राजा ते श्री संत गजानन महाराज यांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या तीर्थ क्षेत्र शेगाव या शहरांना जोडणाऱ्या भक्तिमार्ग ला शासनाकडून मान्यता मिळाली आहे त्यामुळे लाखो भाविक व शेतकरी आनंदीत झाला आहे.
सदर भक्तीमार्ग ला आवश्यक शेतजमीन देण्यास शेतकरी वर्ग तयार आहे म्हणून सरकारने होऊ घातलेल्या महत्वाकांक्षी प्रकल्प ला आमची संमती आहे म्हणून सरकारने तत्परतेने भूसंपादन प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी व शेतकऱ्यांना समृद्धी महामार्ग प्रमाणे पाच पट मोबदला मिळावा अशी मागणी शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी तथा भू संपादन अधिकारी प्रा संजय खडसे यांना निवेदनात केली आहे. निवेदन देताना सुभाष सवडे पाटील, बद्रि डोके, बद्रि सानप, दगडूबा शेळके, साहेबराव मस्के, विजय शेळके, पवण शेळके, राजू शेळके, शिवहरी बुरकुल,गणेश बोबले, मारूती केकाण , दिनेश मुंढे, ओम पालवे, काशिनाथ मुंढे, रामेश्वर डोळे, कैलास सवडे, शेख अनवर ,सचिन शिंगणे, रंगा शिंगणे, जगन्नाथ सानप, सुनील भानुसे, अरूण भागीले उपस्थित होते.
,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here