लोकदर्शन 👉प्रा.अशोक. डोईफोडे
गडचांदूर – सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सावित्रीबाई फुले विद्यालय गडचांदूर येथे दि.1ऑगस्टला भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक तसेच लोकशाहिर, साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक धर्मराज काळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शाळेचे पर्यवेक्षक महेंद्रकुमार ताकसांडे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष महेंद्रकुमार ताकसांडे तसेच प्रमुख अतिथि सुरेश पाटील यांनी लोकमान्य टिळक तथा आणाभाऊ साठे यांच्या जीवनकार्यावर विदयार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन तथा आभारप्रदर्शन जेष्ठ शिक्षिका ज्योती चटप यांनी केले. सदर कार्यक्रमाला माधुरी उमरे, जी.एन. बोबडे, मांढरे, किन्नाके, आडे, मेश्राम, सुषमा शेंडे. कोंगरे, यांचेसह शिक्षकेत्तर कर्मचारी, शशीकांत चन्ने तथा शाळेतील सर्व विद्यार्थी यांनी उपस्थित राहून सहकार्य केले.