लोकदर्शन उरण👉विठ्ठल ममताबादे
उरण दि २ ऑगस्ट उरण मध्ये महिलांवरील बलात्कार, विनयभंग, अत्याचारात वाढ झाली असून महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे महिलांना सुरक्षा मिळावी, कोणावरही अत्याचार, अन्याय होऊ नये, उरण मध्ये विविध अपघात होतात त्या अपघात ग्रस्त व्यक्तींना तातडीने मदत मिळावी म्हणून उरण शहर काँग्रेस व उरण तालुका काँग्रेसने पुढाकार घेतला आहे.उरण रेल्वे स्टेशन येथे अपघात तसेच मोठया प्रमाणात दुर्घटना होऊ लागल्या आहेत. त्यासाठी उरण रेल्वे स्थानक येथे स्टेशन आवारात सीसीटीव्ही कॅमेरे लावणे,शौचालय साफसफाई व स्टेशनच्या गेट समोर लाईटचे खांब बसवून लाईटची व्यवस्था तातडीने करण्यात यावी यासाठी उरण तहसीलदारांना व उरण रेल्वे प्रशासन यांना उरण तालुका व शहर काँग्रेस तर्फे निवेदन देण्यात आले.या प्रसंगी उरण शहर काँग्रेस अध्यक्ष प्रकाश पाटील, उरण तालुका काँग्रेस महिला अध्यक्षा रेखा घरत, उरण तालुका काँग्रेस महिला उपाध्यक्षा निर्मला पाटील, उपाध्यक्षा अश्रया शिवकर,उरण शहर उपाध्यक्ष गुफरान तुगेंकर आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.सदर मागण्या पूर्ण झाल्या नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेस तर्फे प्रशासनाला देण्यात आला आहे.