लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर
गडचांदुर दिनांक २ऑगस्ट जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा तळोधी येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची 104 वी जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी शाळेचे ज्येष्ठ शिक्षक संतोष जुनगरी अध्यक्ष म्हणून होते. प्रमुख अतिथी म्हणून अजित साव कांतीलाल चव्हाण , शाळा मंत्री मंडळ मुख्यमंत्री कुमारी डॉली खेवले, आजचा गुलाब उपक्रमाअंतर्गत सुंदर, स्वच्छ मुलगा- मुलगी रुद्र अंबाढरे ,आयुष हनुमंते, कांचन ढोबे ,निहारिका केळझरकर होते. याप्रसंगी प्रमुख अतिथींनी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले. सुहानी झाडे ,कृतिका येसेकार ,युवराज खेवले ,लावण्या टेकाम, सपना गेडाम ,सानिका लांडगे डॉली खेवले या विद्यार्थ्यांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन चरित्रावर ती माहिती दिली.
शाळेतील शिक्षक कांतीलाल चव्हाण यांनी प्रास्ताविकेत अण्णाभाऊ साठे यांनी जीवनात किती संघर्ष केला ,कादंबऱ्या ,कथा, पोवाडे वग असे साहित्य लिहिले याबद्दल माहिती दिली. अजित साव यांनी अण्णाभाऊ यांचे जीवन किती संघर्षमय होते .यशस्वी होण्यासाठी त्यांनी कोणते प्रयत्न केले .आयुष्याच्या शेवटी अण्णाभाऊंना किती हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या याबद्दल माहिती सांगितली. कार्यक्रमाचे अध्यक्ष होते त्यांचं जीवन चरित्र प्रत्येकाने वाचले पाहिजे असे आवाहन विद्यार्थ्यांना केले. कार्यक्रमाचे संचालन शाळेतील विद्यार्थिनी कुमारी रागिनी खेवले तर आभार गौरव देहारकर या विद्यार्थ्याने केले. मागील महिनाभर स्वच्छ मुलगा -मुलगी म्हणून स्वयम कुंभारे व कांचन ढोबे यांना शाळेतर्फे बक्षीस देण्यात आले .सुंदर मनोगत व्यक्त केल्याबद्दल डॉली खेवले तसेच सुंदर संचालन केल्याबद्दल रागिनी खेवले या विद्यार्थिनींना शाळेच्या वतीने पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला.