लोकदर्शन जिवती👉 प्रा. गजानन राऊत
विदर्भ महाविद्यालय जिवती आणि नीरी नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने वनस्पतीशास्त्र विभागातर्फे ” डेव्हलपमेंट ऑफ प्लांट डायवर्सिटी ऑन डीग्रेडेड ल्यांड” या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली. याप्रसंगी मंचावर डॉ. लाल सिंग, मुख्य शास्त्रज्ञ, सी.एस.आय.आर.- नीरी, नागपूर हे मुख्य व्याख्यानकर्ते, डॉ. प्रमोद खडसे, सेडी, प्राचार्य डॉ. शारदा शाक्य, प्रा. करण राठोड, प्रा. सचिन यनगंदलवार उपस्थित होते.
डॉ. लाल सिंग यांनी आपल्या व्याख्यानात नीरीने मागील पाच – सहा वर्षांत पर्यावरण समतोल राखण्यासाठी केलेल्या भरीव कामगिरीबद्दल माहिती दिली तसेच नागपूर जवळील आणि चंद्रपूर जवळील भागात फ्लाय एश ज्या भागांत टाकला जातो त्या परिसरात बांबू लागवड करून हिरवळीचा भाग तयार करण्यात आली आहे. तसेच,आता या परिसरात जैव विविधता दिसून येत असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. प्रमोद खडसे यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांनी ज्ञानार्जन करत असताना जीवनातील ध्येय गाठण्यासाठी परिश्रम करणे आवश्यक असल्याचे सांगितले. डॉ. शारदा शाक्य यांनी आपल्या भाषणात जिवती परिसरातील भौगोलिक परिस्थितीशी माहिती देत, येथील सामान्य माणसाच्या आयुष्यात प्रगतीचा आलेख कसा उंचावता येऊ शकतो याबद्दल सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम समन्वयक प्रा. सचिन शिंदे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. परवेझ अली यांनी तर आभार डॉ. योगेश खेडेकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेकरीता सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.