,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
लोकदर्शन गडचांदूर👉मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
महात्मा गांधी विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय, गडचांदूर ची 2024-2025 सत्रातील पहिली पालक सभा ३० जुलै ला पार पडली ,सभेच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री साईनाथ मेश्राम होते,प्रमुख अतिथी म्हणून उपप्राचार्य श्री प्रफुल्ल माहुरे, पर्यवेक्षक श्री शंकर तुराणकर, पर्यवेक्षिका सौ विना देशमुख, शिक्षक पालक संघाचे तत्कालीन सचिव श्री हरिहर खरवडे तसेच मोठ्या प्रमाणात पालक वर्ग,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
सर्वप्रथम महात्मा गांधींच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली .प्रमुख पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. सभेमध्ये विविध समित्यांची स्थापना करण्यात आली. यामध्ये नवीन शिक्षक पालक कार्यकारणी गठीत करण्यात आली तसेच माता पालक was -शिक्षक संघ तयार करण्यात आला व काही समित्यांची पुनर्रचना करण्यात आली त्यासोबतच शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी व गुणवत्ता वाढीसाठी विविध विषयावर चर्चा करण्यात आली त्यामध्ये काही पालकांनी सूचना केल्या व तसेच आपल्या पाल्यांच्या समस्या सांगितल्या या सर्व सूचना व समस्यांचे मुख्याध्यापक श्री साईनाथ मेश्राम यांनी निराकरण केले व भविष्यात शाळेच्या गुणवत्ता वाढ व विकासासाठी सर्व पालकांनी मदत करण्याचे आवाहन केले. पालक सभेचे प्रास्ताविक सौ विना देशमुख यांनी केले. श्री प्रफुल्ल माहुरे यांनी सभेला मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षक श्री वामन टेकाम तर आभार प्रदर्शन सहाय्यक शिक्षक श्री प्रशांत धावेकर यांनी केले.
सभेला शिक्षक,पालक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.