लोकदर्शन वालुर/प्रतिनिधी👉
महादेव गिरी
वालुर येथील स्व.नागाबाई साडेगांवकर शिक्षण प्रसारक मंडळ संचालित वाल्मिकेश्वर माध्यमिक विद्यालय व ज्ञानदिप प्राथमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त 22 ते 28 जुलै या कालावधीत वाल्मिकेश्वर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.डि.भोकरे,वालुरचे केंद्रप्रमुख दत्तात्रय रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण सप्ताह कार्यक्रमामध्ये विविध उपक्रम घेऊन साजरा करण्यात आला आहे.सप्ताहाच्या पहिल्या दिवशी TLM DAY म्हणून साजरा करण्यात आला.यामध्ये चला शिकुया भितीपत्रकातुन,खटपुतली नाट्य,खेळणी बोलु लागली तर हस्तलिखिताचे तरंगचित्र स्टाॕलमध्ये लावण्यात आले.शिक्षण सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी पायाभुत साक्षरता व संख्या ज्ञान दिवस यामध्ये भाषिक खेळ व जादुई गणित यातुन मनोरंजनात्मक माहिती दिली.सप्ताहाचा तिसरा दिवस क्रिडा दिन म्हणून साजरा करण्यात आला.यामध्ये लिंबु चमचा,दोरीवरील उड्या,,सुईमध्ये दोरा ओवणे,टिपरी,लगोरी यासारखे विविध खेळ घेण्यात आले.सप्ताहाच्या चौथ्या, पाचव्या दिवशी विविध उपक्रम राबविण्यात आले.सप्ताहाचा सहावा दिवस Eco clubs for mission life day म्हणुन साजरा करण्यात आला.यामध्ये ईको क्लब स्थापन करणे आणि विद्यार्थी,त्यांची माती आणि धरणी माता यांचे नाते मजबूत करण्यासाठी विद्यालयाच्या प्रांगणात वॄक्षारोपण मोहिम राबविण्यात आली.सप्ताहाच्या शेवटचा दिवस दि.28 जुलै रविवार हा दिवस तिथी भोजन ऊपक्रम राबवुण साजरा करण्यात आला.तिथी भोजन हा उपक्रम स्नेह भोजन उपक्रम म्हणून राबविण्यात आला.ऊपक्रमात राजेश साडेगांवकर, संदिप सोनवणे, डॉ.अरविंद शिंदे, डॉ.दिपेश्वर रासवे ,राज रेवणवार,सगाजी महारनोळ, दत्ता सोनवणे ,उमेदसिंग ठाकुर या व्यक्तिंच्या वतीने शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनींन साठी वरण,पोळी,मोतिचुर लड्डू,मोठ आलेली मटकी,भात,आमटी व भाजी आदी खाद्य पदार्थांची मेजवानी आयोजित करुन विद्यार्थ्यांना स्नेह भोजनाच आस्वाद दिला.याप्रसंगी वालुर केंद्रांचे प्रमुख दत्तात्रय रोकडे यांनी स्नेह भोजनाला भेट देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.यावेळी वाल्मिकेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.डि.भोकरे व ज्ञानदिप विद्यालयाचे मुख्याध्यापक भागवत मोरे उपस्थित होते.हा शिक्षण सप्ताह उत्साहात साजरा करण्यासाठी जि.एम.कावळे,व्हि.एन.बोंडे,एस.ए.महाडिक, सौ.एस.आर.स़नवणे, प्रविण क्षीरसागर,सौ.गिता मळी,सौ.शिंदे,डि.आर.नाईकनवरे,आर.बी.राठोड,बि.व्हि.बुधवंत,एम.एस.गिरी, उमाकांत क्षीरसागर, कैलास राऊत, बळीराम शेंबडे आदिंनी परीश्रम घेतले.