राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वतीने जत विश्र्वास सप्ताह ला प्रारंभ ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, ⭕२८ जुलै ला समारोप

 

लोकदर्शन.👉 प्रा.अशोक डोईफोडे
,,,,,,,,,,,,,,,
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उप मुख्यमंत्री ना अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने संपूर्ण राज्यात पक्षाच्या वतीने जत विश्वास सप्ताह साजरा करण्यात येत आहे, सिंदखेड राजा मतदार संघात सुद्धा माजी मंत्री आमदार डॉ राजेंद्र शिंगणे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा अध्यक्ष ॲड नाझेर काझी, प्रदेश उपाध्यक्ष टि डी अंभोरे, प्रदेश सरचिणीस डॉ रामप्रसाद शेळके, यांच्या सहकार्याने ७, दिवस भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे, २२जुलै ला गोंधणखेड येथे तालुका शेतकरी सन्मान मेळावा व विविध करोडो रुपयांच्या विकास कामाचे भूमिपूजन आमदार डॉ राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते करण्यात आले.
सायंकाळी चार वाजता शेतकऱ्यांना रोही तसेच इतर जंगली प्राण्यांपासून होत असलेल्या त्रासातून शेतकऱ्यांनी मुक्तता व्हावी व शेतमालाच्या संरक्षण करीता झटका मशीनचे वितरण व मार्गदर्शन करण्यात आले,
देऊळगाव राजा तालुक्यांतील पत्रकारांचा सत्कार आमदार डॉ राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते करण्यात आला.
२३ जुलै ला वृक्षारोपण, वन उद्यान निर्मिती करणे व वृक्ष वाटप कार्यक्रम आयोजित केला आहे,
२४ जुलै ला देऊळगाव राजा व सिंदखेड राजा तालुक्यांतील ५००० विद्यार्थ्याना संविधान पुस्तक वाटप करण्यात येणार आहे,
२६ जुलै ला दोन्ही तालुक्यांतील नोंदणीकृत २५००कामगारांना ७हजार रुपयांच्या संसार उपयोगी वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात येणार आहे.
२७ जुलै ला देऊळगाव राजा तालुक्यांतील महिला बचत गटाच्या २००० भगिनींना टिफीन बॉक्स चे वाटप करण्यात येईल,
२८जुलै ला देऊळगाव राजा येथे ४किमी च्या भव्य मॅरॅथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रथम बक्षीस ११००१रूपये, द्वितीय ५००१ रूपये, तृतीय ३००१ रूपये, व ५ स्पर्धकांना प्रत्येकी १००० रूपया चे प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात येणार आहे,
देऊळगाव राजा व सिंदखेड राजा तालुक्यामध्ये मोटारसायकल रॅली काढण्यात येईल, त्याच वेळी भोलेशा बाबा येथे चादर अर्पण, बालाजी महाराज मंदिर येथे आरती, तसेच सिंदखेड राजा येथे राष्ट्रमाता मां जिजाऊ साहेबांना अभिवादन करण्यात येईल व विविध धार्मिक स्थळांना भेटी देण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत दिली. आमदार डॉ राजेंद्र शिंगणे यांनी मतदार संघातील विविध प्रकारच्या विकास कामासाठी करोडो रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याचे सांगून बुलढाणा जिल्हा केंद्रीय बँकेला फार मोठी रककम शासनाकडून मंजुर करण्यात आली असल्याचे सांगितले,पत्रकार परिषदेत आमदार डॉ राजेंद्र शिंगणे, जिल्हा अध्यक्ष ॲड नाझेर काझी, प्रदेश सरचिटणीस डॉ रामप्रसाद शेळके, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष जाधव,शहर अध्यक्ष कविष जिंतूरकर, तालुका अध्यक्ष संजीव शिरसाट, तथा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते,

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *