लोकदर्शन उरण 👉विठ्ठल ममताबादे
उरण दि २१ जुलै सामाजिक बांधिलकी जपण्याच्या उद्देशाने स्थापित झालेल्या शिवसंकल्प समालोचक असोसिएशन, उरण-रायगड च्या तर्फे रांजणपाडा येथील वडिलांचे छत्र हरपलेल्या कु. तेजस्वी नरेंद्र तांडेल या अकरावीत शिकत असलेल्या गरीब विद्यार्थिनीस वह्या पुस्तके सर्व शैक्षणिक साहित्य, शाळेचा गणवेश आणि शैक्षणिक फी च्या स्वरूपात आर्थिक मदत देण्याचा कार्यक्रम धुतुम ग्रामपंचायतीचे माजी सरपंच जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते की ज्यांच्या हस्ते शहीद जवानांच्या मदतीसाठी दरवर्षी पाच लाखाचा निधी दिला जातो अश्या दानशूर व्यक्तिमत्वाच्या हस्ते त्यांच्याच धुतुम येथील ऑफिस मध्ये पार पडला. यावेळी असोसिएशनच्या मदती सोबतच धनाजी ठाकूर यांच्या वतीने ५ हजारांची मदतही सदर विद्यार्थिनीस देण्यात आली.कार्यक्रमाप्रसंगी बोलताना धनाजी ठाकूर यांनी असोसिएशनचा संकल्प आणि आजवर केलेल्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करून असोसिएशनला माझ्यातर्फे कधीही कोणत्याही स्वरूपाची मदत लागल्यास नि:संकोच पणे केली जाईल असे अभिवचन दिले.सदर कार्यक्रमास धनाजी ठाकूर यांच्या समवेत असोसिएशनचे अध्यक्ष नितेश पंडित, उपाध्यक्ष श्याम ठाकूर, कार्याध्यक्ष पप्पू सूर्यराव, सचिव सुनिल वर्तक, सहसचिव विद्याधर गावंड, सदस्य देव डाकी, दर्शना माळी, हेमाली म्हात्रे, जगदीश कदम, विद्यार्थिनीच्या परिवारातील विकास पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीस असोसिएशन चे सचिव सुनिल वर्तक यांनी उपस्थितांचे स्वागत करून असोसिएशन स्थापनेचा हेतू आणि कार्याची संकल्पना मांडली, असोसिएशन चे अध्यक्ष रायगड चे सुप्रसिद्ध निवेदक नितेश पंडित यांनी आपल्या प्रास्ताविकात असोसिएशन च्या या अगोदर केलेल्या कार्याचा उल्लेख करताना चालू वर्षातील नियोजित सामाजिक उपक्रमांची माहिती विशद केली तर असोसिएशनच्या सदस्या तथा सुप्रसिद्ध निवेदिका दर्शना माळी यांनी सामाजिक कार्य करताना समाधान आणि काम करण्याची ऊर्जा मिळत असल्याचे सांगून मदत दिलेल्या विद्यार्थिनीस यापुढेही असोसिएशनच्या माध्यमातून शैक्षणिक कार्यात मदत करण्याची हमी देऊन उपस्थितांचे आभार मानले.