बारामती मध्ये टेनिस क्रिकेट पंच परीक्षा संपन्न

By : Ganesh Bhalerao 

नाशिक :

टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र व टेनिस क्रिकेट असोसिएशन पुणे ग्रामीण यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय टेनिस क्रिकेट पंच परीक्षा बारामती मध्ये संपन्न झाली. याकरिता पुणे ग्रामीण मधून वेगवेगळ्या तालुक्यातून अनेक क्रीडा शिक्षक व क्रीडा मार्गदर्शकांनी सहभाग नोंदवला होता त्याच्यामध्ये सेमिनारसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून टेनिस क्रिकेट असोसिएशन इंडियाचे सचिव मीनाक्षी गिरी मॅडम या उपस्थित होत्या तसेच टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्राचे सहसचिव चंद्रकांत तोरणे सर व टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्राचे गुणलेखक संदीप पाटील सर तसेच टेनिस क्रिकेट असोसिएशन पुणे ग्रामीण अध्यक्ष आशिष डोईफोडे हे उपस्थित होते.  या पंच परीक्षेमध्ये वेगवेगळ्या शाळेच्या शिक्षकांनी सहभाग नोंदवला होता. या कार्यक्रमांमध्ये सूत्रसंचालन सोमनाथ भोसले यांनी केले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *