विद्यार्थ्यांनी संवर्ग विकास अधिकाऱ्यांना विचारला ‘अवघड’ प्रश्न..!!

By : Nitesh Shende

बिबी (कोरपना ): जिल्हाभरात जिल्हा परिषदेचा शाळा सुरु झाल्या असून यंदा जिल्हा परिषद शाळेकडे विद्यार्थ्यांचा कल वाढलेला आहे.अधिकारीसुद्धा शाळा भेटीवर भर देत आहेत. १६ जुलै रोजी कोरपणा तालुक्याचे संवर्ग विकास अधिकारी विजय पेंदाम यांनी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सांगोडा या शाळेला भेट देत परिपाठ घेतला. यावेळी एक अवघड प्रश्न विद्यार्थ्यांनी विचारून खूष केले.

अधिकाऱ्यांनी पूर्ण अर्धा तास परिपाठाचे निरीक्षण केले. दरम्यान आदित्य भोयर या विद्यार्थ्याने संवर्ग विकास अधिकारी विजय पेंदाम यांना “साहेब मला तूमच्यासारखा अधिकारी व्हायचं आहे. त्यासाठी मला काय करावे लागेल” असा प्रश्न केला. यावर उत्तर देत त्यांनी त्यांची संपूर्ण वाटचाल विद्यार्थ्या समोर मांडली. अत्यंत गरिबीतुन जिद्द, चिकाटी आणि सातत्य आणि मेहनतीचा जोरावर जिल्हा परिषदेचा विद्यार्थी ते संवर्ग विकास अधिकारी असा प्रवास पूर्ण केला. मेहनतीचा बळावर यश गाठता येते. अथक परिश्रम घेतल्यास तू पण नक्कीच एक दिवस माझा सारखा संवर्ग विकास अधिकारी होशील असा विश्वास त्यांनी आदित्यला देत सर्व विद्यार्थ्यांना सात्यात्याने अभ्यास व मेहनत करीत राहील्यास तुम्ही नक्की यशस्वी व्हाल असा विश्वास विद्यार्थ्याना दिला.

संवर्ग विकास अधिकारी विजय पेंदाम यांनी शाळा भेटीदरम्यान बराच वेळ विद्यार्थ्यासोबत घालवीला. विद्यार्थ्यांनां अनेक शैक्षणिक प्रश्न केले. त्यांचा अनेक प्रश्नाचे स्वतः उत्तरे दिली. शाळेचा शैक्षणिक बाबींची माहिती घेत शाळेची आणि विद्यार्थ्यांची प्रगती यावर समाधान व्यक्त केले. शाळेचा मुख्याध्यापिका शोभा शेंडे शिक्षक राजेश धांडे, रमेश टेकाम अंगणवाडी सेविका पुष्पा वरपटकर, यांच्यासह पालक व गावातील नागरिक उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *