लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा तळोधी येथील मुख्याध्यापक रामुजी गावंडे सर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. त्यांचा सेवानिवृत्ती पर कार्यक्रम सपत्नीक आयोजित करण्यात आला. याप्रसंगी तळोधी ग्रामपंचायत च्या सरपंच सौ ज्योतीताई जेणेकर उपस्थित होत्या. तसेच प्रमुख अतिथी म्हणून उपसरपंच माननीय श्री रवींद्र कुडमेथे, गोरखनाथ लांडगे, वंदनाताई गोखरे, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष श्री अविनाश भाऊ आत्राम, प्रितम नवले ,एकनाथ लांडगे ,देवराव खेवले, कोराडी शाळेचे मुख्याध्यापक श्री रमेश पारखी, नवेगाव शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रभाकर मडावी, अंगणवाडी सेविका मायाताई गोखरे, रमेश जुलमे ,कुबडे पाटील ,विठ्ठलराव गोहोकार, लक्ष्मण पाटील आवारी, ईसनकर पाटील होते. याप्रसंगी शाळेच्या तसेच गावकऱ्यांच्या वतीने श्री गावंडे सर यांचा सपत्नीक भेटवस्तू देऊन उचित सत्कार करण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांनी स्वतःने बनवलेल्या पुष्पगुच्छाने सत्कार केला.
याप्रसंगी माननीय श्री गावंडे सर यांनी सत्कार पर आपले मनोगत व्यक्त करताना नोकरीची सुरुवाती पासून ते सेवानिवृत्ती पर्यंत ज्या ज्या शाळेत काम केले त्याच्या आठवणी सांगितल्या. तळोधी गावात सहा वर्षाची सेवा करताना कोणतीही अडचण गेली नाही तसेच सर्व शिक्षक, गावकरी यांच्याकडून मोलाचे सहकार्य मिळाले याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. तसेच शाळेला गावंडे सरांनी ब्लूटूथ साउंड बॉक्स व माईक भेट दिली. यावेळी प्रमुख पाहुणे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजित साव, संचालन श्री संतोष जुनगरी सर तर आभार श्री कांतीलाल चव्हाण सर यांनी केले