उमेद कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात आ. सुभाष धोटेंनी घेतला सहभाग : सरकारने प्रलंबित मागण्या तातडीने पूर्ण करण्याची केली मागणी.

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती

राजुरा :– उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी संघटनेच्या वतीने आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनस्थळी चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांनी सहभागी होऊन संघटनेच्या मागण्या व आंदोलनाला आपला जाहीर पाठिंबा दिला आणि आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला. राज्य सरकारने तातडीने संघटनेच्या सर्व न्याय्य मागण्या तातडीने पुर्ण करण्याची मागणी केली. यावेळी त्यांनी राजुरा विधानसभा क्षेत्रातील राजुरा, कोरपना, जिवती व गोंडपिपरी तालुक्यातील महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत उमेद महिला व कर्मचाऱ्यांशी प्रत्यक्ष भेटून संवाद साधला. यावेळी उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी, कर्मचारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
या संघटनेकडून उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानास ग्रामविकास व पंचायत राज विभागामधील शासनाचा एक नियमित विभाग म्हणून आस्थापनेला मान्यता देणे व त्या अंतर्गत कार्यरत कंत्राटी अधिकारी व कर्मचारी आणि समुदाय संसाधन व्यक्ती यांना शासनाच्या समकक्ष पदांवर कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करून घेणे., प्रभागसंघ स्तरावरील केडर – कृषी व्यवस्थापक, पशु व्यवस्थापक, मत्स्य व्यवस्थापक व प्रभागसंघ व्यवस्थापक यांचे इतर उमेद अभियानातील केडर प्रमाणे मानधनवाढ करणे., गावस्तरावर उपजीविका गाव फेरी आयोजनातून उपजीविका क्षमता बांधणी व बेरोजगार वर्धिनीना रोजगार संधी उपलब्ध करून देणे इत्यादी मागण्यांसाठी आक्रमक भूमिका घेतली आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *