आ. सुभाष धोटेंच्या मागणीवर महसूलमंत्र्यांची मुंबईत बैठक : जनतेच्या समस्या तातडीने सोडविण्याचे महसूलमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना निर्देश.

 

लोकदर्शन 👉मोहन भारती

राजुरा :– लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांनी राजुरा विधानसभा क्षेत्रातील जनतेच्या प्रश्नांचे निवारण करण्यासाठी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे तसेच प्रत्यक्ष भेटून मागणी केली होती. यावर महसूल व वन विभाग मंत्रालय मुख्य इमारत, पहिला मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मुंबई येथे महसूल, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी अपर मुख्य सचिव (महसूल) महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई, प्रधान सचिव (उद्योग), उद्योग विभाग, मंत्रालय, मुंबई, जमाबंदी आयुक्त व संचालक, भूमी अभिलेख, पुणे, आयुक्त (कामगार), महाराष्ट्र राज्य, जिल्हाधिकारी, चंद्रपूर, प्रांत अधिकारी, राजुरा, जि. चंद्रपूर, विभागीय अधिकारी, एम. आय. डी. सी., चंद्रपूर, सहाय्यक आयुक्त (कामगार), चंद्रपूर, तहसिलदार, राजुरा / जिवती, उद्योग अधिकारी, चंद्रपूर आदी अधिकारी प्रत्यक्ष तसेच विडिओ काँन्फरंसींग द्वारा आनलाईन उपस्थित होते.
यावेळी चंद्रपूर जिल्ह्य़ातील जिवती तालुक्यातील महसूली अभिलेख (संगणकीकृत) ऑनलाईन करणे, राजुरा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेत जमीनीचा ऑनलाईन मिळणारा सातबारा पूर्ववत करून मिळणे. राजुरा शहरातील सर्व्हे क्र.१४९/९९ आजारी ४.०५ हेक्टर पैकी सरकार जमा आराजी ०.४० आर जागेवर अतिक्रमण हटविणे, अंबुजा सिमेंट कंपनी पूर्वीची (मराठा सिमेंट वर्क्स) व महाराष्ट्र शासन यांच्यात दि.१३.८.१९९९ रोजी झालेल्या नोंदणीकृत कराराचे उल्लंघन झाल्याने कंपनीचा करार रद्द करणे इत्यादी विषयांवर चर्चा करण्यात येऊन मा. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना वरील विषयानुसार तातडीने कारवाई करून राजुरा विधानसभा क्षेत्रातील जनतेला न्याय मिळवून देण्याचे निर्देश दिले आहेत.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *