लोकदर्शन चंद्रपूर 👉 मोहन भारती
चंद्रपूर /राजुरा ५.जुलै:– राज्यातील विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका सप्टेंबर – ऑक्टोबर २०२४ रोजीचे दरम्यान होणार आहेत. या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाच्या इच्छुक उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज प्रदेश काँग्रेस कमिटी / जिल्हा कॉँग्रेस कमिटी कार्यालयात दि. १०/८/२०२४ पर्यंत जमा करावेत असे आवाहन चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांनी केले आहे.
विधानसभा मतदारसंघांसाठी उमेदवारी अर्जासोबत सर्वसाधारण वर्गासाठी रुपये २०,०००/- (अक्षरी रुपये वीस हजार मात्र) आणि अनु. जाती, अनु. जमाती, व महिला उमेदवारांसाठी रुपये १०,०००/- (अक्षरी रुपये दहा हजार मात्र) याप्रमाणे रक्कम पक्षनिधी म्हणून रोख अथवा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी च्या नांवे डी. डी. द्वारे प्रदेश कार्यालयाकडे / जिल्हा काँग्रेस कमिटीकडे जमा करावेत असे सुद्धा नमूद करण्यात आले आहे.