By : लोकदर्शन कोरपना
एके काळी राज्यस्तरीय तंटामुक्ती पुरस्कार प्राप्त केलेल्या कढोली खुर्द येथे आज 4 जुलै रोजी सकाळी दहाच्या सुमाराला दारूच्या वादात पुतण्याने काकाला चाकूने भोसकल्याची घटना घडली. जखमीची प्रकृती चिंताजनक असून चंद्रपूर येथे सामान्य रुग्णालयात उपचार घेत आहे. दालमिया सिमेंट कंपनीच्या जवळच असलेल्या कढोली खुर्द येथे बाळा बापूराव तोडासे हा अवैध दारू विक्री करीत होता. दारू विक्रीच्या कारणावरून सकाळी दहाच्या सुमारास वाघू शामराव तोडासे याच्याशी भांडण झाले. तेव्हा संतापलेल्या बाळा तोडासे याने सुरीने वार केल्याने वाघू तोडासे गंभीर जखमी झाले. जखमीला चंद्रपूर येथे हलविण्यात आले असून गडचांदूर पोलीस घटनेचा तपास करीत आहे.