लोकदर्शन 👉 प्रा.अशोक डोईफोडे
गडचांदूर- सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ व्दारा संचालित सावित्रीबाई फुले विदयालय, क. महाविद्यालय गडचांदूर येथिल शारीरिक शिक्षक आर. एस. वासेकर नियत वयोमानानुसार दि.30 जूनला सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्त त्यांचा सपत्नीक निरोप तथा सत्कार समारंभाचे आयोजन दि. २ जुलैला शाळेच्या सभागृहात करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संख्येचे अध्यक्ष डॉ. आनंदराव अडबाले होते. तर प्रमुख अतिथि म्हणून संस्थेचे सचिव माजी प्राचार्य नामदेवराव बोबडे, संचालक नोगराजजी मंगरुळकर, संचालिका नलिनीताई डोहे, शाळेचे मुख्याध्यापक धर्मराज काळे, पर्यवेक्षक महेंद्रकुमार ताकसांडे, उपस्थित होते. याप्रसंगी संस्थेच्या वतीने तसेच शाळेतील सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने आर.एस. वासकर तसेच सौ. कल्पना वासेकर यांचा सपत्निक शाल, श्रीफळ तसेच भेटवस्तू, मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मंचावर उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा मान्यवरांनी वासेकर यांच्या सेवाकार्यातील कार्यकर्तृत्वाचा गुणगौरव केला. तसेच सेवानिवृत्तीनंतरचे जीवन सुखमय, निरामय, राहण्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. यावेळी ज्योती चटप, प्रा. मुप्पीडवार, प्रा. सुरपाम, सिताराम पिंपळशेंडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. वासेकर यांनी कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाचे संचालन प्रा. प्रशांत खैरे यांनी तर आभार कु भुवनेश्वरी गोपमवार योनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळा, क. महाविदयालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी यांनी उपस्थित राहून सहकार्य केले.