प्रकल्पग्रस्तांच्या शाळांना भुखंड मिळावे.* *♦️ जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन*

 

लोकदर्शन उरण 👉विठ्ठल ममताबादे

उरण दि २ जुलै सिडको प्रकल्पग्रस्तांच्या शैक्षणिक संस्था चालवीत असलेल्या शाळांना भूखंड मिळण्यासाठी दोन वर्षांपुर्वी सिडको प्रशासना कडून प्रकल्पग्रस्तांसाठी निविदा काढण्यात आल्या होत्या. प्रकल्पग्रस्तांच्या बऱ्याच संस्थांनी सर्व कागदपत्रांची पूर्तता करूनही हि निविदा सिडको कडून नंतर रद्द करण्यात आली होती. त्यानंतर त्याकडे कोणीही लक्ष दिले नाही.कामगार नेते तथा रायगड जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष महेंद्रशेठ घरत हे सिडकोकडे पाठपुरावा करत आहेत परंतु सिडको व्यवस्थापन पाहिजे तितके लक्ष देताना दिसत नाही. त्यामुळे कामगार नेते तथा जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी काल महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.एकनाथराव शिंदे यांची विधानभवनात भेट घेवून निवेदन दिले व या प्रश्नाकडे लक्ष घालण्याची विनंती केली.यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडुन सकारात्मक प्रतिसाद मिळाला.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *