इंटक संघटना असंघटीत व संघटीत कर्मचाऱ्यां सोबत सदैव ठाम उभी राहील ! – कामगार नेते महेंद्रशेठ घरत.

 

लोकदर्शन उरण 👉विठ्ठल ममताबादे

उरण दि २ जून नॅशनल युनियन ऑफ पोस्टल एम्प्लॉइज यांचे द्विवार्षीक अधिवेशन व अजय विठोबा जाधव यांचा सेवानिवृत्ती कार्यक्रमाचे रविवार दि. ३० जून २०२४ रोजी नविन पनवेल येथे आयोजन करण्यात आले होते. या अधिवेशनाचे उदघाटन इंटकचे राष्ट्रीय सचिव, कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या शुभहस्ते करण्यात आले. सॉर्टींग पोस्टमन अजय विठोबा जाधव हे आपल्या ४४ वर्षाच्या सेवेनंतर दिनांक ३० जून २०२४ रोजी सेवा निवृत्ती झाले सेवापूर्ती निमित्त मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. अधिवेशन उदघाटन प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करतांना इंटकचे राष्ट्रीय सचिव महेंद्रशेठ घरत म्हणाले की, जगातील सर्वात जास्त सभासद संख्या असलेली इंटक संघटना सदैव देशभरातील संघटीत व असंघटीत कर्मचारी यांच्या पाठीशी ठाम उभी राहील.राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक )ही संघटना देशात एक नंबरची राष्ट्रीय संघटना असून कामगारांचे हक्क अबाधित राखण्यासाठी सर्वतोपरी काम करणारी एकमेव संघटना असल्याचे सर्व उपस्थित मान्यवरांनी सांगितले.

या कार्यक्रमासाठी श्रीमती. सरण्या मॅडम (डि.पी.एस.नवी मुंबई), मोहम्मद साहीद (प्रवर अधिक्षक नवी मुंबई विभाग), प्रकाश शेवाळे (मा. प्रवर अधिक्षक नवी मुंबई), अभिजित इचके (प्रवर अधिक्षक पुणे विभाग), सेंथिल पिल्लई (उपअधिक्षक,मुख्यालय), नितीन येवला (डि.डी.एस. सि.ओ), सुनिल झुंजारराव, निसार मुजावर, टि. एन.राहटे, संतोष कदम आदी मान्यवर उपस्थित होते.त्याच बरोबर पोस्टल एम्प्लॉइज युनियनचे शेकडो सभासद उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *