सेवानिवृत्तांनी समज बांधवांच्या उन्नतीसाठी हातभर लावावा : ÷आमदार सुभाष धोटे. ♦️खैरे कुणबी कर्मचारी समाज मंडळाच्या वतीने गुणवंत विद्यार्थी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार.

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती

गोंडपिपरी :– खैरे कुणबी कर्मचारी समाज मंडळ, गोंडपिपरी द्वारा खैरे कुणबी समाज भवन गोंडपिपरी येथे गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा तया सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी गोंडवाना विद्यापीठाचे माजी सिनेट सदस्य सुनील शेरकी आणि नांदगाव चे सरपंच हिमाणी वाकूळकर यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले. यावेळी उद्घाटनपर मार्गदर्शन करताना आ. सुभाष धोटे म्हणाले की, गुणवंत विद्यार्थी आणि कर्तव्यरत किंवा सेवानिवृत्त कर्मचारी हे समाजाचे भुषण असतात. गुणवंत विद्यार्थ्यांनी अधिक परिश्रमातुन जीवन ध्येय गाठण्यात यशस्वी व्हावे आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी समाजातील तळागाळातल्या समज बांधवांच्या उन्नतीसाठी आपल्या अनुभवाचा उपयोग करावा असे आवाहन केले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष खैरे कुणबी समाज स्नेह व सांस्कृतिक मंडळ चंद्रपूर चे अध्यक्ष डॉ. विजयराव देवतळे, विशेष अतिथी माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, गोंडपिपरी कृ. उ. बा. स. सभापती इंद्रपाल धुडसे, स्वागताध्यक्ष सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष देवेंद्र बट्टे, सरपंच संघटनेचे अध्यक्ष देविदास सातपुते, प्रमुख पाहुणे माजी सभापती दिपक सातपुते, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तुकाराम झाडे, पोंभुर्णा तालुका काँग्रेस अध्यक्ष वासुदेव पाल, व्यसनमुक्ती संघटनेचे अध्यक्ष गणपत चौधरी, कृ. उ. बा. स. संचालक अशोक रेचनकर, महिला बालकल्याण सभापती वनिताताई वाघाडे, आरोग्य व बांधकाम सभापती रंजनाताई रामविरकर, नगरसेवक अनिल झाडे, खैरे कुणबी समाज मंडळ चे तालुकाध्यक्ष नामदेव सांगडे, माजी अध्यक्ष संजय झाडे, जिल्हाध्यक्ष दिनकर ठोंबरे यासह खैरे कुणबी समाज मंडळ चे सर्व पदाधिकारी, सदस्य आणि समज बांधव मोठय़ा संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खैरे कुणबी समाज मंडळ चे अरूण झगडकर, आकाश झाडे, सुनील कोहपरे, किशोर भोयर, कोरडे, पाल, विजय बट्टे यासह खैरे कुणबी समाज मंडळाच्या सर्व पदाधिकारी व समाज बांधवांनी परिश्रम घेतले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *