उलवेमध्ये नवीन फौजदारी कायद्या विषयी मार्गदर्शन.

लोकदर्शन.उरण👉विठ्ठल ममताबादे

उरण दि २९ जून
शुक्रवार दि १/७/२०२४ पासून देशात नवीन फौजदारी कायदा अस्तित्वात येणार असून या नवीन फौजदारी कायद्याची जनतेला ओळख व्हावी, नवीन कायद्या विषयी जनतेत जनजागृती व्हावी या अनुषंगाने नवी मुंबई पोलीस आयुक्तालय अंतर्गत न्हावा शेवा पोलीस ठाणे आणि आम्ही उलवेकर मित्र मंडळ व महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सचिन राजे येरुणकर यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक १/७/२०२४ रोजी पासून जे नवीन कायदे लागू होणार आहेत त्या बद्दल अंजुमन बागवान – वरिष्ठ पोलीस निरीक्षक न्हावा शेवा बंदर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. श्री. सिद्धिविनायक गणपती मंदिर सेक्टर १७, उलवे येथे हे मार्गदर्शन शिबीर पार पडले.या शिबिरात नागरिकांना विविध कायद्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजुमन बागवान यांनी नागरिकांना दिली.यावेळी रविशेठ पाटील-संस्थापक अध्यक्ष साई मंदिर वहाळ , सचिन घरत उपसरपंच,राजेंद्र घरत, राकेश घरत-अध्यक्ष सेक्टर ८, विनोद थोरात, संदीप पाटील, निलेश पाटील,रोहन खंडू,साई पैकडे, अंकुश साळवे आदी मान्यवर तसेच समस्त उलवे नोड मधील रहिवाशी आणि विविध सामाजिक संस्था संघटनेचे पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *