माजी विद्यार्थी मित्र परिवारातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
लोकदर्शन गडचांदूर 👉 प्रा.अशोक डोईफोडे
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
महात्मा गांधी विद्यालय, गडचांदूर येथील 1996 मधील दहाव्या वर्गाच्या माजी विद्यार्थी मित्र परिवारातर्फे ऋणानुबंधातील आठवणीच्या भेटी गाठी व वर्ष 2023 – 2024 या सत्रातील दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच माजी मित्र-मैत्रिणींचा सत्कार सोहळ्याचे आयोजन 24 जून ला बालाजी सेलिब्रेशन गडचांदूर येथे करण्यात आले. या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांनी दीप प्रज्वलनाने केली स्वागत पुष्पगुच्छाने काही मित्र-मैत्रिणींनी केले
यानंतर दहावी च्या गुणवंत विद्यार्थी कु.अनुष्का विलास दुबे (94•40%) पहिला क्रमांक, शाश्वती सचिन वाघमारे (91•20%) दुसरा क्रमांक, नयन दशरथ केळरझर (90•20%) तिसरा क्रमांक, खुशी चंद्रकांत येलेकर(90•00%) चौथा क्रमांक यांचा बक्षीस आणि शिल्ड देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दत्ताभाऊ पुरी, होते तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ पंकजराव मत्ते, भाऊराव मत्ते , घाडगे सर , गोडसेलवार सर
,विरूटकर सर , देरकर सर तसेच वांढरे सर यांनी भूषविले आणि अतिथी यांच्या हस्ते कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. तसेच सत्कारमूर्ती डॉ. सौ .मंजुषा ताई पंकजराव मत्ते यांचा सत्कार माजी मैत्रिणीच्या हस्ते शाल श्रीफळ, ट्रॉफी देऊन करण्यात आला त्यांच्या अथक प्रयत्नाने त्यांनी पी.एच.डी. सारखी पदवी प्राप्त करुण उल्लेखनीय कार्य केले. तसेच सर्व मित्र व मैत्रीण परिवाराला एकत्रित आणणाऱ्या श्री. राजूभाऊ ठेपाले व मैत्रीण सौ. सविताताई जेनेकर यांचा सत्कार सर्व मित्र मिळून व अहो ग्रुप नी शाल श्रीफळ देऊन केला. या कार्यक्रमादरम्यान मित्र परिवारातील गीत गायन व लहान मुलांचा डान्स च्या माध्यमातून मनोरंजन करण्यात आले तसेच आलेल्या मित्र-मैत्रिणींचा परिचय घेण्यात आला. मित्र परिवारातील नृत्यकलाकारांना प्रोत्साहनात्मक बक्षीस देण्यात आले. शेवटी सर्व परिवारासाठी भोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. अशाप्रकारे कार्यक्रम आनंदात भेटीगाठीत आणि जुन्या आठवणी नेहमी स्मरणात असाव्या अशी छबी मित्र मैत्रिणी यांच्या हृदयावर उमटेल.. अशाप्रकारे पार पडला. आणि हा अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम सर्व मित्र-मैत्रिणीच्या सहकार्याने पार पडला.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *