निवडणूकांसाठी अर्थसंकल्पात लोकप्रिय घोषणांचा पाऊस ; सर्वसामान्यांच्या पदरी घोर निराशा : आमदार सुभाष धोटे.

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती

राजुरा :– महाराष्ट्र राज्याच्या आजच्या अर्थसंकल्पात सरकारने येणाऱ्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून लोकप्रिय घोषणांचा पाऊस पाडला मात्र यातून सर्व सामान्य माणसाच्या पदरी घोर निराशाच पडली आहे. राज्यावर ७ लाख कोटी रुपयांहून अधिक कर्जाचे डोंगर उभे असतांना या आधी च्या घोषणा पुर्ण केले नसतांना आता या नवीन अवाढव्य आणि जवळजवळ फसव्या घोषणा हे सरकार कसे काय पुर्ण करणार आहेत. शेतकरी, शेतमजूर, कामगार, बेरोजगार युवक, महिला, नोकरदार वर्ग, व्यापारी, उद्योजक या सर्वच घटकांना केवळ स्वप्नांचे गाजर दाखविण्यात आले आहेत. वाढती महागाई, बेरोजगारी, शेतमालांचे कोसळलेले भाव, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत, पिकविम्याच्या थकलेल्या रक्कमा, कोलमडून पडलेली आरोग्य व्यवस्था, निधी अभावी तसेच जल जीवन अंतर्गत खराब अवस्थेतील रस्ते, राज्यात निर्माण झालेला कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न, प्रलंबित असलेल्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्त्या, अर्धवट असलेले घरकुल, निराधारांचे अनुदान, खुंटलेला औद्योगिक विकास, महाराष्ट्राबाहेर जाणारे प्रकल्प यासारख्या अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर कुठलेही ठोस आणि धोरणात्मक उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. सरकार च्या दुर्लक्षामुळे महावितरण ने विज जोडण्या न जोडल्याने अनेक शेतकरी टाहो फोडत आहेत. नियमित विज बिल भरूनही वारंवार विज पुरवठा खंडित होत असल्याने राज्य सरकार व महावितरण वर नागरिकांचा प्रचंड रोष आहे मात्र याबाबत कोणतेही स्पष्ट धोरण व तरतूद यात नाही. आनलाईन नोकरभरतीत मोठय़ा प्रमाणात अनियमितता आणि गोंधळ पहायला मिळत आहे त्यामुळे बेरोजगार तरुणांमध्ये या सरकार विरोधात तिव्र असंतोष आहे. जनता आता या महायुती सरकार च्या फसव्या घोषणांना काही केल्या बळी पडणार नाही आणि येणाऱ्या निवडणुकीत यांना धडा शिकविल्याशिवाय शांत बसणार नाही अशी प्रतिक्रिया लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांनी दिली आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *