जनतेच्या समस्या तातडीने सोडवा : आढावा बैठकीत आ. सुभाष धोटेंचे अधिकाऱ्यांना निर्देश.

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती

गोंडपिपरी :– पंचायत समिती गोंडपिपरी येथे तालुक्यातील विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची आढावा सभा बोलावून आमदार सुभाष धोटे यांनी विविध विभागांचा आढावा घेतला आणि जनतेच्या समस्या तातडीने सोडविण्याचे निर्देश सर्व विभागांना दिलेत. यामध्ये तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत, कृषी पंपांची विज जोडणी, रस्त्यांची, घरकुलांची कामे पुर्ण करणे, संजय गांधी निराधार योजनेचे पैसे तातडीने लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करणे, रोजगार हमी, मनरेगा ची कामे सुव्यवस्थेतपणे करणे, नाली, गटारे सफाई करणे, धूर फवारणी करणे, जल जीवन ची कामे पूर्ण करून गावागावांत फोडलेले रस्ते अध्ययावत करणे, शुध्द पाणी पुरवठा करणे, अन्नपूरवठा यंत्रणा सुव्यवस्थित करणे, चढ्या भावाने व बोगस बियाण्यांची होणाऱ्या विक्रीवर आळा घालणे, सुरजसगड च्या जडवाहतुकीत अपघातग्रस्तांना मदत करणे आशा विविध बाबींवर माहिती घेऊन समस्या तातडीने सोडविण्याचे निर्देश दिलेत.
या प्रसंगी तहसीलदार शुभम बहाकार, गटविकास अधिकारी अरुण चनफने, उपविभागीय अभियंता विनोद खापने, मुख्याधिकारी डॉ. सुरज जाधव, तालुका कृषी अधिकारी सचिन पानसरे कृषी अधिकारी महेंद्र डाखरे, पोलीस निरीक्षक हत्तीगोटे, बोरकर, जिल्हा व्यवस्थापक राजु नंदनवार, वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेखा मुरकुटे, सुधाकर राठोड, संदीप मडावी, संतोष चोले, सीडीपीओ गीता कदम, विज वितरण चे सहाय्यक अभियंता तेजप्रकाश लेकुरवाळे, सुनील मुंडे, आकाश ठाकूर, भुमि अभिलेख चे प्र. ग. धकाते, आर. आर. धोंडगे, डॉ. पी. आर. खोब्रागडे, श्रद्धा जयस्वाल, श्रीनिवास कंदनुरीवार, तालुकाध्यक्ष तुकाराम झाडे, नगराध्यक्षा सविता कुडमेथे, उपाध्यक्षा सारीका मडावी, कार्याध्यक्ष निलेश संगमवार, पोडसाचे सरपंच तथा सरपंच संघटनेचे अध्यक्ष देविदास सातपुते, कृ. उ. बा. स. संचालक शंभुजी येवलेकर, संतोष बंडावार, महिला तालुकाध्यक्षा सोनी दिवसे, महेंद्रसिंग चंदेल, अनिल शिंदे, नामदेव सांगडे, गौतम झाडे, समाधान भसारकर, राजु येवलेकर, अनिल झाडे, जितेंद्र गोहणे यासह सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *