गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स चा धडाका अनेक प्रश्न मार्गी लागणार* *⭕आमदार श्री सुधाकर अडबाले यांचे विद्यार्थी व शिक्षकांचे प्रश्न लवकर मार्गी लावण्याचे विद्यापीठ प्रशासनाला निर्देश*

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती

राजुरा -गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स असोसिएशनच्या वतीने प्राध्यापकाच्या संदर्भात 13 मागण्यांचे निवेदन कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांना सादर केले होते या अनुषंगाने शिक्षक आमदार मा. सुधाकर अडबाले यांच्या उपस्थितीमध्ये सभा संपन्न झाली या सभेमध्ये प्राध्यापकांच्या विविध समस्यांबद्दल सांगोपांग चर्चा झाली यावेळी शिक्षक आमदार सुधाकर अडबालेयांनी प्रशासनाला अनेक प्रश्न अंतर्गत धारेवर धरले.
गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स असोसिएशनच्या वतीने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण मधील विविध समस्या सोडविणे, वित्त व लेखा विभागात झालेल्या आर्थिक गैरव्यवहारची सखोल चौकशी करणे व प्राध्यापकांचे प्रवास भत्ता परीक्षक देयके व इतर देयके त्वरित मंजूर करणे, शिक्षकांचे स्थान निश्चित तिचे प्रक्रिया कामानिमित्त येणाऱ्याशिक्षकांना निवासासाठी विद्यापीठात शिक्षक भवन निर्माण करणे,चिमूर येथे विद्यापीठ सुविधा केंद्र ची निर्मिती,आचार्य पदवीची सुलभ प्रक्रिया करणे,शारीरिक शिक्षक व ग्रंथालय शास्त्र विषयाचे संशोधन केंद्र निर्माण करणे, फाईल ट्रेकिंग सिस्टम लावणे तसेच कार्यकारी प्राचार्य पदाला सरसकट एक वर्षाची मान्यता देणे या संदर्भात अनेक मागण्या विद्यापीठाचा सादर केलेले होत्या या सर्व मागण्यावर आयोजित सभेत सविस्तर चर्चा झाली मा. आमदार श्री सुधाकर अडबाले सर यांनी प्रत्येक प्रश्न समजून घेऊन सर्व प्रश्न सोडवण्याच्या संदर्भात विद्यापीठाला निर्देश दिले यावेळी यंग टीचर संघटनेच्या वतीने डॉ.संजय गोरे डॉ. विवेक गोरलावार डॉ.अक्षय धोटे, डॉ.विजय वाढई डॉ. रामदास कांमडी , सिनेट सदस्य डॉ. सतिश कन्नाके, डॉ. मिलिंद भगत,श्री अजय लोंढे, डॉ. दिलीप चौधरी,श्री दिपक धोपटे सोबत प्राचार्य डॉ.वाडकर, प्राचार्य डॉ. लेमदास लडके डॉ.शशिकांत गेडाम, डॉ.राजेंद्र गोरे, डॉ.राजु किरमिरे, डॉ. प्रमोद बोधाणे प्राचार्य ठावरी व इतर पदाधिकाऱ्यांनी आपली भूमिका सभागृहात विशद केली.
या संदर्भात कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे व प्र-कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे यांनी सर्व प्रश्न सोडवण्या संदर्भात संघटनेला आश्वासित करून या सभेचे व निर्णयाचे इतिवृत्त त्वरीत पाठवण्याचे आश्वासन दिले आहे. यावेळी गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स असोसिएशनचे अनेक वरिष्ठ पदाधिकारी व समन्वयक विविध महाविद्यालयातील प्राध्यापक प्रामुख्याने मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *