भारत टॅलेंट सर्च(BTS)स्पर्धा परीक्षेत केंद्र शाळा वेहेळे शाळेचे सुयश

 

लोकदर्शन भिवंडी👉-गुरुनाथ तिरपणकर

-भारत टॅलेंट सर्च(BTS)स्पर्धा परीक्षा२०२४मध्ये जिल्हा परिषद केंद्रशाळा वेहेळे येथील विद्यार्थ्यांनी दैदिप्यमान यश संपादन केले आहे.इयत्ता पहिली ते आठवी तील एकुण८५पैकी ८२विद्यार्थ्यी चांगल्या गुणांनी यशस्वी झाले आहेत.त्यापैकी ठाणे जिल्हा गुणवत्ता यादीत आठवी इयत्तेचे३विद्यार्थ्यांनी पहील्या३मध्ये क्रमांक मिळवून यश संपादित केले आहे.यशस्वी विद्यार्थी-इयत्ता८वी.१)पार्थ विजय पाटील,जिल्ह्यात प्रथम(राज्यात८वा क्रमांक)पटकावला.२)ओंकार संजय वाघमारे,जिल्ह्यात द्वितीय(राज्यात९वा क्रमांक)सहारा कल्पेश पाटील,जिल्ह्यात तृतीय(राज्यात९वा क्रमांक)या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका सौ.ममता निकावडे मॅडम,वर्गशिक्षिका सौ.जयश्री मनोहर ढाके मॅडम तसेच वेहेळे शाळेचे शिक्षकवृंद यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.तसेच मा.गटशिक्षणाधिकारी श्री.संजय अस्वले,विस्तार अधिकारी वैशाली डोंगरे मॅडम,मा.केंद्रप्रमुख सौ.ममता निकावडे मॅडम व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सर्व सदस्य वेहेळे यांची प्रेरणा व मार्गदर्शन लाभले.विद्यार्थ्यांच्या या यशा बद्दल सर्वत्र सर्व गुणवंत यशस्वी विद्यार्थी,वर्गशिक्षिका व पालक वर्ग यांचे कौतुक व अभिनंदन होत आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *