लोकदर्शन 👉मोहन भारती
जिवती :– पंचायत समिती जिवती येथे तालुक्यातील विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची आढावा सभा बोलावून आमदार सुभाष धोटे यांनी विविध विभागांचा आढावा घेतला आणि आदिवासी बहुल, अतिदुर्गम भागातील जनतेच्या समस्या तातडीने सोडविण्यास प्राधान्य देण्याचे निर्देश सर्व विभागांना दिलेत. यामध्ये जिवती तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत, कृषी पंपांची विज जोडणी, रस्त्यांची, घरकुलांची कामे पुर्ण करणे, संजय गांधी निराधार योजनेचे पैसे तातडीने लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करणे, रोजगार हमी, मनरेगा ची कामे सुव्यवस्थेतपणे करणे, नाली, गटारे सफाई करणे, धूर फवारणी करणे, जल जीवन ची कामे पूर्ण करून गावागावांत फोडलेले रस्ते अध्ययावत करणे, शुध्द पाणी पुरवठा करणे, अन्नपूरवठा यंत्रणा सुव्यवस्थित करणे, चढ्या भावाने व बोगस बियाण्यांची होणाऱ्या विक्रीवर आळा घालणे, शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करणे आशा विविध बाबींवर माहिती घेऊन समस्या तातडीने सोडविण्याचे निर्देश दिलेत.
या प्रसंगी तहसीलदार अविनाश शेंबटवाड, गटविकास अधिकारी हेमंत भिंगारदिवे, मुख्याधिकारी डॉ. सुरज जाधव, उपविभागीय अभियंता सुमेध खापरडे, गटशिक्षणाधिकारी धनराज आवारी, कृषी अधिकारी गावडे मॅडम, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणपत आडे, प्रा. सुग्रीव गोतावळे, एम. बी. राठोड, सागर गाडगे, कनिष्ठ अभियंता प्रवीण देवतळे, विवेक चौहान, सुमित रामटेके, श्रीकांत गोपाले, चंदू जाधव, डॉ. स्वप्नील टेंभे, राजेंद्र बांबोळे, दिनेश मोरे, चंद्रकला उईके, के. व्ही. करकाळे, एस. टी. राठोड, प्रशांत सयाम, विशाल उरकुडे, रत्नाकर वाढई, समीर दळमल, नितेश ढोकणे, सुनील झोडे, अमर साठे, जयदीप ठावरी, डॉ.अंकुश गोतावळे श्री अमर राठोड श्री ताजुद्दीन शेख आस्पक भाई, किसणू राठोड, प्रकाश पवार, वामन पवार, नंदाताई मुसने, मनीषा लांडगे, नितीन जांभुळकर, बालाजी वाघमारे, लहुजी गोतावळे, विजय कांबळे, सुनील शेळके, मुकेश चव्हाण अमोल कांबळे, श्री बाळू पतंगे, देविदास साबणे, श्री मारुती मोरे, सिताराम मडावी, दत्ताजी गायकवाड, संतोष जाधव, पांडुरंग कांबळे, बापूजी सीडाम, डॉ. विनय वानखेडे, सोनेराव पेंदोर, विठ्ठल राठोड, मनोज किन्नाके यासह सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.