राजुरा काँग्रेसच्या वतीने खा. राहुलजी गांधींचा वाढदिवस उत्साहात : उपजिल्हा रुग्णालयात फळांचे वितरण.

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती

राजुरा :– अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते, जननायक खासदार राहुलजी गांधी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या श्रीराम मंदिर राजुरा जवळील जनसंपर्क कार्यालयात केक कापून वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला तर उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथे रुग्णांना फळांचे वितरण करण्यात आले. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आ. सुभाष धोटे म्हणाले की, आपले नेते खा. राहुलजी गांधी हे दिल्ली पासून तर गल्ली पर्यंत काँग्रेस पक्षाच्या बळकटीसाठी अहोरात्र परिश्रम घेत आहेत. भारत जोडो पदयात्रेच्या माध्यमातून जनसामान्यांचे प्रश्न समजून घेत त्यांनी अतिशय कणखरपणे लोकसभा निवडणुकीत काँग्रेस तथा इंडियाच्या माध्यमातून मोठे यश मिळवून दिले आहे. येणाऱ्या काळात आपण सर्वांनी अधिक परिश्रम घेऊन आपल्या क्षेत्रात तसेच जिल्हात काँग्रेसच्या सहाच्या सहाही विधानसभा मतदारसंघात विजय निश्चित करून महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यासाठी सज्ज व्हायचे आहे. खा. राहुलजी गांधींचा पाच न्याय हक्काचा संदेश घरोघरी पोहचवून जनसंपर्क, जनसंवाद आणि जनसेवेला प्राधान्य द्या असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.
या प्रसंगी माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, तालुकाध्यक्ष रंजन लांडे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे, साईनाथ बतकमवार, माजी नगरसेवक प्रभाकर येरणे, आनंद दासरी, गजानन भटारकर, शहराध्यक्ष संतोष गटलेवार, महिला काँग्रेस अध्यक्षा निर्मला कुडमेथे, शहराध्यक्षा संध्या चांदेकर, जिल्हा महासचिव एजाज अहमद, काँग्रेस अनुसूचित जाती विभाग तालुकाध्यक्ष कोमल फुसाटे, अभिजित धोटे, उईके सर, अनंता एकडे, अविनाश जेनेकर, अँड. चंद्रशेखर चांदेकर, मतिन कुरेशी, अरुण सोमलकर, सुभाष बोरकुटे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष ईर्षाद शेख, अशोक राव, आशिष नलगे, धनराज चिंचोलकर, प्रणय लांडे, आकाश मावलीकर, पुणम गिरसावळे, इंदूबाई निकोडे, सुमित्राबाई कुचनकर, कामीना उईके, नंदा गेडाम, नितू बानकर, बोरकरताई यासह राजुरा काँग्रेसच्या फ्रंटल आर्गनायझेशन चे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *