By : Shankar Tadas
कोरपना : 16/6/2024 रोज रविवारला अभियंता भवन अमरावती येथे शिक्षक सन्मान अभियान अंतर्गत राष्ट्रनिर्माता शिक्षक सन्मान सोहळा मोठ्या थाटात पार पडला.यामध्ये जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आसन खुर्द येथील सहाय्यक शिक्षक श्री.तुकाराम यादव धंदरे यांना राष्ट्रनिर्माता शिक्षक सन्मान 2024 पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.
त्यांच्या शाळेचे पुराच्या पाण्याने खुप मोठे नुकसान झाले. लोकसहभागातून शाळा सुंदर फुलवली. प्रगत शैक्षिणक महाराष्ट्र अभियान अंतर्गत त्यांच्या वर्गाला 500-600 शिक्षक,पालक,अधिकारी यांची भेट, परसबागेत विविध भ्याज्यांची लागवड,नवरत्न,सांस्कृतिक स्पर्धेत विद्यार्थी जिल्हास्तरावर निवड,स्कॉलरशिप परीक्षेत गुणवत्ता धारक विद्यार्थी,किलबिल बचत बँक, उत्कृष्ट BLO म्हणून निवड, रक्तदान कार्य,तालुका, केंद्र येथे तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून कार्य, शाळा बाहेरची शाळा उपक्रमात दोन विद्यार्थी नागपूर आकाशवाणीवर मुलाखतीसाठी निवड, निपून भारत अभियानाअंतर्गत 3 माता गटाची नागपूर आकाशवाणीवर मुलाखतीसाठी निवड,शिक्षणाची वारी उपक्रमाअंतर्गत शैक्षणिक साहित्याची जिल्हास्तरावर दुसऱ्यांदा निवड, निपूनोस्तव उपक्रमाअंतर्गत जिल्हावर निवड,शिक्षकांची यशोगाथा जिल्हा परिषद चंद्रपूर 2018-19 अंतर्गत कार्याचा लेख पुस्तकात समावेश,इतर सहशालेय उपक्रम शाळेत राबवून ते विद्यार्थी गुणवत्ता वाढ व सर्वागीण विकासासाठी प्रयत्न तसेच विद्यार्थी पालकत्वासाठी पुढाकार इत्यादी कार्यासाठी त्यांना महाराष्ट्र राज्य शिक्षक सन्मान अभियान अंतर्गत राष्ट्रनिर्माता शिक्षक सन्मान 2024 पुरस्कार प्रदान करण्यात आला.
त्यांच्या यशाचे श्रेय कोरपना पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी मा.सचिनकुमार मालवी,केंद्रप्रमुख मा.पंढरी मुसळे,शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती,समस्या गावकरी मंडळी यांना दिले आहे.
त्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन केले जात आहे.
हा पुरस्कार मिळाल्याबद्दल श्री. विजय ढाकुलकर राज्यअध्यक्ष,श्री. संतोष बोरकर राज्यउपाध्यक्ष,श्री.बापू भोयर राज्यकार्याध्यक्ष तथा सर्व कार्यकारिणीचे आभार मानले.