आढावा बैठकीत आ. सुभाष धोटेंनी केली अधिकाऱ्यांची कान उघडणी : जनतेचे प्रश्न सोडविण्याचे दिले निर्देश.

लोकदर्शन 👉 मोहन भारती

कोरपना :– पंचायत समिती कोरपणा येथे तालुक्यातील विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची आढावा सभा बोलावून आमदार सुभाष धोटे यांनी विविध विभागांचा आढावा घेतला आणि जनतेच्या समस्या तातडीने सोडविण्याचे निर्देश सर्व विभागांना दिलेत. यामध्ये कोर तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत, कृषी पंपांची विज जोडणी, रस्त्यांची अर्धवट कामे पूर्ण करणे, घरकुलांची कामे पुर्ण करणे, संजय गांधी निराधार योजनेचे पैसे तातडीने लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करणे, रोजगार हमी, मनरेगा ची कामे सुव्यवस्थेतपणे करणे, नाली, गटारे सफाई करणे, धूर फवारणी करणे, जल जीवन ची कामे पूर्ण करून गावागावांत फोडलेले रस्ते अध्ययावत करणे, शुध्द पाणी पुरवठा करणे, अन्नपूरवठा यंत्रणा सुव्यवस्थित करणे, चढ्या भावाने व बोगस बियाण्यांची होणाऱ्या विक्रीवर आळा घालणे आशा विविध बाबींवर माहिती घेऊन त्या तातडीने सोडविण्याचे निर्देश दिलेत.
या प्रसंगी तहसीलदार प्रकाश व्हटकर, गटविकास अधिकारी विजय पेंदाम, जेष्ठ काँग्रेस नेते जि. म. बँकेचे संचालक विजयराव बावणे, तालुकाध्यक्ष उत्तमराव पेचे, माजी सभापती श्यामभाऊ रणदिवे, माजी उपसभापती संभाजी कोवे, माजी जि. प. सदस्य सीताराम कोडापे, उपविभागीय कृषी गिरीश अधिकारी कुलकर्णी, पोलीस निरीक्षक अजिंक्य तांबाडे, पोलीस उपनिरीक्षक रमेश आत्राम, तालुका कृषी अधिकारी जी. डी. ठाकूर, सहाय्यक अभियंता महेश वाटेकर, प्रमोद राऊत, कनिष्ठ अभियंता आर. पी. मकासरे, गटशिक्षण अधिकारी सचिन मालवी, नगरसेवक नितीन बावणे, गणेश गोडे, इरफान शेख, राजाबाबू गलगट, भाऊराव चव्हाण, विनोद नवले, संदीप मोरे, बाबाराव मालेकर, साईनाथ डाखरे, शैलेश लोखंडे, दिपक खेकारे, संदीप मोहुर्ले, निकेश देवाळकर यासह सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *