दि लिटल फ्लॉवर स्कूल चा उत्कृष्ट निकाल

 

लोकदर्शन 👉प्रा.अशोक डोईफोडे

. चंद्रपूर :- दि पब्लिक एडुकेशन सोसायटी चंद्रपूर द्वारा संचालित दि लिटल फ्लॉवर इंग्लिश स्कूल नगीना बाग चंद्रपूर स्थित दरवर्षी प्रमाणे यंदाही दहावी चा निकाल उत्कृष्ट ठरला. या शाळेतून दहावी च्या परीक्षेत पंधरा विध्यार्थी बसले होते. बारा विध्यार्थी उत्कृष्ट श्रेणित पास झाले.यात ग्रीष्मा गिरडकर (76.20),सुरज निकोडे (75.20),तेजस देवतळे (73),आरुष फुलझेले (70.60),पूर्वा पेटकर (68.40),निशांत निकुरे (64),माही मोहुर्ले (58.20),करण नहरकर (55.60),निहाल शेख (55),ईशा उमरे (52.80),विश्वजीत वाळके (52.80), सुफियान शेख (52) टक्के मार्क्स घेऊन उत्तीर्ण झाले. यात दोन विदयार्थ्यांनी सर्वोकृष्ट गुण घेतले, चार विध्यार्थी प्रथम श्रेणित तर सहा सहा विध्यार्थी
द्वितीय श्रेणित पास झाले या सर्व विध्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्षा श्रीमती प्रमिला गुलाबरावजी दुबे, उपाध्यक्ष सिद्धार्थ घनश्याम गोसावी शाळेच्या मुख्याध्यापिका मीनाक्षी मून व शिक्षक वृंद यांनी सर्व दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीच्या शुभेच्छा दिल्यात.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *