By : Shankar Tadas
गडचांदूर- म. रा. माध्य.व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ,नागपूर बोर्डाचा दहावीचा निकाल नुकताच जाहीर झाला. यात सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सावित्रीबाई फुले विद्यालय,गडचांदूरचा निकाल ८३:२२ टक्के लागला. १४९ पैकी १२४ विदयार्थी उत्तीर्ण झाले. प्रथम श्रेणी ३७, द्वितिय श्रेणी ५२ पास श्रेणी ३१ तर प्रावीण्य श्रेणीत ४ विद्यार्थी आहेत. परिक्षेत गुणवंत आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यान कु. रिया केळझरकर ९१.८०% कु. श्रुतिका तुराणकर ७९१ कु. दिक्षा कुचनकर ७८.८०, तनु सावरकर ७५, साहिल राठोड ७४ संचिता बोटरे ७४, अविना जाधव ७३, श्रुती थेरे ७३, कु.नम्रता गुंडले, कु.श्रुति अरकिलवार,शान जाधव, शालिनी चेलपेलवार इ. गुणवंत विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ व पेढा भरवून सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक धर्मराज काळे होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून विद्यार्थ्यांना जीवनात यशाची उंच शिखरे गाठावित अशी अपेक्षा व्यक्त केली, कार्यक्रमाला प्रमुख पाहुने म्हणून पं. स. कोरपनाचे गटशिक्षणाधिकारी मालवी साहेब, तसेच शाळेचे पर्यवेक्षक महेंद्रकुमार ताकसांडे. यांनी विद्याथ्यानी कठोर परिश्रम करून जीवनात यश संपादित करण्याचे सांगितले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी सुध्दा मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन राजेश मांढरे यांनी तर आभार माधुरी उमरे यांनी मानले. कार्यक्रमासाठी नामदेव बावनकर, सुरेश पाटील, यांच्यासह शिक्षकेत्तर कर्मचारी लिलाधर मत्ते, शशीकांत चन्ने, सिताराम पिंपळशेंडे यांनी सहकार्य केले.