लोकदर्शन 👉 मोहन भारती
राजुरा :– महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी परिक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला. इयत्ता १० वी च्या निकालात इन्फंट जिजस सोसायटी द्वारा संचालित इन्फंट जिजस इंग्लिश हायस्कूल राजुरा येथील इयत्ता १० वी स्टेट बोर्ड च्या विद्यार्थ्यांनी १०० % निकालाची परंपरा कायम ठेवली असून शाळेतून निशांत निलकंठ गोहने ने ९३ .% गुणासह प्रथम, हितेश चंद्रकांत जयपूरकर ने ९१.६० % गुणासह द्वितीय, सुमित संजय जुनघरी ने ९१ % गुणासह तृतीय, तन्मय सुरेश भटारकर ने ९० % गुणासह चौथा तर सम्यक विजय फुलझेले ने ८९.६० % गुणासह पाचवा क्रमांक पटकावला आहे. या परिक्षेत एकुण ६० पैकी विशेष प्राविण्यप्राप्त विद्यार्थी ५० तर प्रथम श्रेणीत १० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून गणित व मराठी मध्ये ८ विज्ञानामध्ये ६ व सामाजिक शास्त्रात १४ विद्यार्थीनी ९० च्या वर गुण प्राप्त केलेले आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आमदार सुभाष धोटे, सचिव माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, संचालक अभिजीत धोटे, मुख्याध्यापिका सिमरनकौर भंगू, मुख्याध्यापिका मंजुषा अलोने, मुख्याध्यापक रफिक अन्सारी यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आणि पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.