बेपत्ता सोहेल खान यांचा तातडीने शोध घ्या : आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना.

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती

राजुरा :– वेकोलीच्या बल्लारपूर क्षेत्रा अंतर्गत येणाऱ्या सास्ती खुल्या खदानीतूत वेकोली सुरक्षा रक्षक सोहेल खान दिनांक २४ मे २०२४ रोजी दुपारच्या सुमारास कर्तव्यावर असताना बेपत्ता झाल्याची घटना घडून ३ ते ४ दिवस उलटूनही अजून पर्यंत त्यांचा थांगपत्ता लागलेला नाही. या गंभीर घटनेची दखल घेऊन आमदार सुभाष धोटे यांनी आज घटनास्थळी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. बेपत्ता खान यांच्या आई मुर्लेशा खान, पत्नी नाजीया खान आणि कुटुंबिय यांच्याशी संवाद साधला, त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. माझा नवरा तीन, चार दिवसांपासून कामावर असताना बेपत्ता आहे. अजूनही काहीही सुगावा लागलेला नाही. आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी पत्नी व कुटुंबीयांनी केली. याबाबत आमदार सुभाष धोटे यांनी त्यांना तातडीने न्याय मिळवून देऊ, जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याशी संपर्क साधून जलदगतीने तपास मोहीम राबवून तातडीने शोध घेऊ असे आश्वस्त केले आणि वेकोली प्रशासन, पोलीस प्रशासनाला सदर गंभीर बाब लक्षात घेऊन सोहेल खान यांचा तातडीने शोध घेण्याच्या सूचना दिल्या. तसेच वेकोलीने कामगारांच्या सुरक्षेला प्रथम प्राधान्य देऊन यापुढे अशा गंभीर घटना घडू नयेत यासाठी खान परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या सुचनाही दिल्या.
यावेळी वेकोली बल्लारपूर क्षेत्राचे एरिया पर्सनल मॅनेजर रामानुजन, सास्ती सब एरिया मोहन क्रिष्णा, पोलीस निरीक्षक योगेश पारधी, बल्लारपूर इंटकचे नेते शंकर दास, एरिया सचिव विश्वास साडवे, सास्ती ओपन कॉस्ट इंटक अध्यक्ष संतोष गटलेवार, कामगार नेते आर आर यादव, अनंता एकडे, विजय कानकाटे, महादेव तपासे, दिनकर वैद्य, दिलीप कनकुलवार, रवी डाहुले, मंमधुकर नरड, गेश उरकुडे, दिनेश जावरे, खान कुटुंबीय, यासह शेकडोंच्या संख्येने वेकोली कामगार उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *