By : Shankar Tadas
चंद्रपूर : ग्रामीण भागात बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण साधले जात असून आता उद्योजकतेडेही वाटचाल सुरू आहे. कोरपना तालुक्यातील बोरी नवेगाव येथील निवेदिता महिला बचत गटाच्या महिलांनी अंबुजा फाउंडेशनच्या माध्यमातून (Sticky Traps) चिकट सापळे तयार करण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. 8 मे रोजी अंबुजा फाउंडेशनच्या अधिकाऱ्यांच्या हस्ते या उपक्रमाचे उदघाटन करण्यात आले.
यावेळी अंबुजा फाउंडेशनचे, उपरवाहीचे आरोग्य विभागाचे प्रमुख बैस, पीयू मॅनेजर विशाल भोगावार, किशोर हजारे, शिवानी शेंडे, निवेदिता महिला बचत गटाच्या अध्यक्षा संगीता तडस, लीड फार्मर अशोक कुडमेथे, शंकर तडस, पोलीस पाटील प्रफुल सिडाम, देवस्थानचे अध्यक्ष संतोष रागीट मंचावर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी निवेदिता महिला बचत गटाच्या कार्याचे कौतुक करून सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. बोरी नवेगाव येथील शेतकरी भवनात आयोजित या कार्यक्रमाला गावातील सर्व बचत गटाच्या महिला व इतर गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रक्षेत्र अधिकारी आशिष रागीट, आभार प्रदर्शन प्रक्षेत्र अधिकारी किशोर शेंडे तसेच आयोजनाकरिता प्रक्षेत्र अधिकारी दत्ता उपरे यांनी विशेष सहकार्य केले.